Ratna Shastra Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gemstone Benefits: करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर 'ही' 5 रत्ने वापरा

ज्योतिषशास्त्रानुसार रत्नांच्या माध्यमातून लोक त्यांच्या जीवनातील सर्व क्षेत्रात यश मिळवू शकतात.

Puja Bonkile

Gemstone Benefits: ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनात रत्नांचा विशेष प्रभाव पडतो.असे मानले जाते की हा रत्न धारण केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात.तर दुसरीकडे कुंडलीत अशुभ ग्रहांच्या स्थितीमुळे भविष्यात एखाद्या व्यक्तीला वाईट परिणाम भोगावे लागत असतील,तर रत्नाच्या मदतीने त्यांचा प्रभाव थोडा कमी केला जाऊ शकतो.

प्रत्येकाने राशीनुसार रत्न धारण करावे. असे केल्याने एखाद्याचे नशीब बदलू शकते. चुकीचे रत्न धारण केल्याने अनेक नुकसान होऊ शकते. अशा वेळी करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कोणते रत्न धारण करावे ते जाणून घेऊया.

  • ओपल रत्न

हे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे रत्न मानले जाते.हे रत्न धारण केल्याने व्यक्तीचे जीवन आकर्षक आणि सुख-समृद्धीने भरलेले राहते. जर एखादी व्यक्ती त्याच्या करिअरमधील अडथळ्यांनी त्रस्त असेल तर ओपल त्याच्यासाठी शुभ असु शकते.

  • पन्ना रत्न

ज्योतिषशास्त्रानुसार, पन्ना रत्न हा बुध ग्रहाचा रत्न आहे.जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा कायद्याच्या क्षेत्रात आपले करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी हे रत्न खूप शुभ मानला जातो.

  • गोमेद रत्न

हे रत्न राहू ग्रहाचा कारक मानले जाते. त्यात राहूच्या शक्ती आणि त्याचे सकारात्मक गुण आहेत. असे मानले जाते की अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे रत्न वापरावे

  • मूंगा रत्न

ज्योतिषशास्त्रानुसार,मूंगा हे मंगळ ग्रहाचे रत्न आहे. ते परिधान करणारे लोक शूर आणि पराक्रमी असतात. सैन्य, पोलीस विभाग आणि संपत्तीशी संबंधित काम करणारे लोक यश मिळवण्यासाठी हे रत्न परिधान करू शकतात.

  • माणिक रत्न

हे रत्न एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि मनोबल वाढवून नेतृत्व गुण वाढवते. तसेच कमकुवत सूर्याला बलवान बनवतात. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी माणिक रत्न खूप शुभ मानले जाते.

  • रत्नांमागील पौराणिक मान्यता

पौराणिक मान्यतांनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने बाहेर निघाली. अमृतावरून देव आणि दानवांचे भांडण झाले. असुरराज अमृताचा सोन्याचा कलश घेऊन पळून गेला. या भांडणात अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. जिथे जिथे पडले तिथे सूर्यकिरणांमुळे ते थेंब सुकले आणि विविध प्रकारच्या रत्नांमध्ये रूपांतरित झाले. नऊ मुख्य रत्ने आहेत आणि बाकीची उपरत्न मानली जातात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT