Fertility Diet: महिलांनी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आहारात करा 'या' 5 पदार्थांचा समावेश

महिलांनी आरोग्याची काळजी घेतल्यास अनेक फायदे होतात.
Fertility Diet
Fertility DietDainik Gomantak
Published on
Updated on

Fertility Diet For Women: आई होणं ही एक आनंदाची बाब असून नैसर्गिक प्रक्रिया आहे. हा प्रवास सुरू होत असतांना तुमचे आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. गरोदर राहण्यासाठी तुमचा आहार कसा असावा? याबाबत माहिती असणे गरजेचे असते. कारण याचा परिणाम तुमच्या शरिरावर होतो.

योग्य वजन आणि लाईफस्टाइल राखून आणि जंक फूड कमी करून तुम्ही तुमचे शरीर गर्भधारणेसाठी अनुकूल करू शकता. त्यामुळे चांगल खाण्याच्या सवयींचा सराव केल्याने तुमची गर्भधारणा झाल्यावर तुम्हाला निरोगी गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते.

पोषक आहारात फळे आणि भाज्या, मासे, भाजीपाला प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांसह पोषक समृध्द अन्न, प्रजननक्षमतेला मदत करू शकतात. अल्कोहोल, ट्रान्स फॅट्स आणि कॅफिन मर्यादित करा. तुमच्या जोडीदाराला निरोगी आहार घेण्यास प्रोत्साहित करा. कारण यामुळे निरोगी शुक्राणूंची निर्मिती होते.

1. एवोकॅडो
हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन ए आणि फोलेटने समृद्ध आहेत. जे पुनरुत्पादक आरोग्यास प्रोत्साहन देतात.

2. मसूर आणि बीन्स
हे प्रथिने आणि फोलेटने समृद्ध असतात जे अंड्यांचा दर्जा सुधारतात.

3. बेरी

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरीमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी फायटोन्यूट्रिएंट्स असतात. ही दोन संयुगे अंड्यांचा दर्जा सुधारतात.

Fertility Diet
Food To Boost Stamina: स्टॅमिना वाढवण्यासाठी 'या' 4 पदार्थांचे करावे सेवन

4. ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्समध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे सेलेनियम अंड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. 

5. ब्रोकोली, पालक, कोबी आणि काळे यांसारख्या हिरव्या भाज्या
ब्रोकोली, पालक, कोबी आणि काळे यांसारख्या हिरव्या भाज्या ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात आणि ग्लूटाथिओनचे उत्पादन उत्तेजित करतात.

6. तीळ
तिळामध्ये आढळणारे पोषक घटक महिलांची प्रजनन क्षमता वाढण्यासाटी मदक करते.

7. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्
ओमेगा 3 समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जसे की मासे, फ्लेक्ससीड, सब्जा, प्रजनन क्षमता आणि अंड्याची गुणवत्ता सुधारतात.

8. पोषक घटकांचा समावेश

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या महिलांनी शक्य तितके पोषक आहार खावे. सर्व प्रकारचे पोषक पदार्थ खाणे फायदेशीर असते. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ सर्व प्रकारची कडधान्ये आणि डाळींचे सेवन करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com