Why does Ganapati love "Durva Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी असे करा बाप्पाला प्रसन्न!

या दिवशीचे शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि बाप्पाच्या पूजेचे नियम जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

Ganesh Jayanti 2023: श्रीगणेशाचा जन्मोत्सव दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच विनायक चतुर्थीला साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असेही म्हटले जाते.

  • गणेश जयंती 2023 रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारी म्हणजेच आज दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि 12.34 मिनिटांपर्यंत संपेल. पण उदय तिथीनुसार गणेश जयंती 25 जानेवारी बुधवारी आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते 12.34 आणि रवियोग बुधवारीच सकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत असेल. परीघ योग 24 जानेवारी रोजी रात्री 9.36 ते 25 जानेवारी सायंकाळी 6.15 पर्यंत असेल. शिवयोग 25 जानेवारीच्या संध्याकाळी 6.15 ते 26 जानेवारीला सकाळी 10.28 पर्यंत असेल.

Ganpati Bappa morya
  • पुजा कशी करावी

  1. आजच्या दिवशी सकाळी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे आणि लाल वस्त्र परिधान करून गणपती बाप्पासमोर उपवासाचे व्रत करावे.

  2. ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवा आणि त्यावर लाल कापड टाकावा. त्यावर कलश स्थापित करा.

  3. आता गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे.

  4. नंतर अस्य प्राण प्रतिषठन्तु अस्य प्राणा: क्षरंतु च। श्री गणपते त्वम सुप्रतिष्ठ वरदे भवेताम।। या मंत्राचा जप करताना पदावर गणपतीची स्थापना करा.

  5. गौरीपुत्र गणेशाला कुंकू, हळद, शेंदूर, अक्षता, चंदन, अबीर, गुलाल, अष्टगंध, मेहंदी, लाल फूल, लवंग, वेलची, अत्तर, सुपारी, कापड, नारळ अर्पण करावे.

  6. आता पवित्र धाग्यात थोडी हळद टाकून ती गणपतीला घालावी आणि 'श्री गणेशाय नमः दुर्वाकुरान समर्पयामि।. मंत्राचा उच्चार करताना 11 किंवा 21 दुर्वा जोडून अर्पण करा.

  7. गणपतीला त्याची आवडती पाच फळे अर्पण करावी.

  8. सुगंधित उदबत्ती आणि तीन दिवे लावून गणपती चालीसा पाठ करा आणि गणेश जयंतीची कथा वाचा.

  9. कुटुंबासह गणपतीची आरती करावी आणि नंतर सर्वांना प्रसाद वाटावा. या दिवशी गाईला तिळाचे अन्न खाऊ घालावे आणि तिळाचे दान करणेही उत्तम.

  • गणेश जयंतीला हे काम करू नका

  1. गणेश जयंतीला गणपतीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर करू नका.

  2. बाप्पाच्या पूजेत सुकी फुले, केतकीचे फूल, पांढऱ्या रंगाच्या वस्तू तुटलेल्या अक्षता यांचा वापर करण्यास मनाई आहे.

  3. गणेश जयंतीच्या दिवशी चुकूनही कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. यामुळे केतूचे अशुभ परिणाम मिळतात. यासोबतच बोलण्यात दोष असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT