Ganesh Chaturthi Decoration Idea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi Decoration Idea: लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अशी करा घराची सुंदर सजावट

घरोघरी गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. यासाठी घरांची सुंदर सजावट देखील केली जाते.

Puja Bonkile

Ganesh Chaturthi Decoration Idea: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाविकांनी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. घरोघरी स्वच्छतेपासून ते स्वादिष्ट मिठाई आणि मोदक बनवण्यापर्यंत या उत्सवाच्या तयारीत भाविक कोणतीही कसर सोडत नाहीत. दरवर्षी बाप्पाचे घरोघरी स्वागत करणारे भाविक आपापल्या घरांची सुंदर सजावट करतात. या वर्षी कोणती गणपती सजावट करावी याचा विचार करत असाल तर पुढे सांगितलेल्या टिप्स ट्राय करू शकता.

  • दिव्यांची सुंदर सजावट

कोणताही भारतीय सण हा दिव्यांच्या सजावटीशिवाय अपुर्ण असते. दिव्याच्या सजावटीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. यंदा गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही घरातील गणेश मंदिर सजवण्यासाठी आणि बाप्पाच्या मूर्तीभोवती दिवे लावू शकता.

  • लाइटिंगची आकर्षक सजावट

गणेश चतुर्थीच्या वेळी घर लाइटिंगचा वापर करून आकर्षक सजावट करू शकता. लाइटिंगमुळे मंदिर आणि घराला हटके लुक मिळेल.बाजारात विविध रंगी लाइटिंग मिळतात.

  • हिरव्या झाडांची सुंदर सजावट

यंदा गणेशोत्सवात हिरवेगार झाडांची सजावट करू शकता. यासाठी तुम्ही बांबूचे लहान झाड, कुंडीतील फुलांचे झाड बाप्पाच्या मुर्तीभोवती ठेऊन सुंदर सजावट करू शकता.

  • फुलांची सुंदर सजावट

सजावटीचे सर्वात जुने आणि लोकप्रिय साधन म्हणजे फुलं. गणपती बाप्पाचे मंडप तुम्ही सुंदर आणि विविध पुलांनी करू शकतात. बाजारात विविध प्रकारचे फुल मिळतात. त्ांचा तुम्ही वीपर करू शकता.  फुलांचा वास पुर्ण घरात फीरतो. घरात प्रसन्न आणि भक्तीमय वातावरण तयार होते.

  • रंगीत सुंदर रांगोळीची सजावट

रांगोळी केवळ दिवाळीलाच नाही तर गणेश चतुर्थीला काढून सुंदर सजावट करू शकता. गणेश पूजेसाठी तुम्ही मंदिराच्या बाहेरील बाजूस आणि मुख्य गेटवर बाप्पाचे स्वागत करण्यासाठी रांगोळीचे सुंदर डिझाइन बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..अखेर ‘आरजीपी’ची वेगळी चूल! काँग्रेससोबत न जाण्‍याचा निर्णय; 28 उमेदवारांचा प्रचार सुरू

Arpora: 'मला पोलिसांनी मंदिरातून उचलले'! हडफडेचे सरपंच कारवाईमुळे संतप्त; भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले सूतोवाच

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

SCROLL FOR NEXT