Friends Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sign Of Fake Friends: तुमचे मित्र खरे की खोटे? 'ही' आहेत लक्षणे

दैनिक गोमन्तक

Sign Of Fake Friends: आपल्यापैकी अनेकांना आपण ज्यांना जवळचे मित्र म्हणतो किंवा मानतो त्यांनी धोका दिल्याचा अनुभव आला असेल. काहीवेळा आपल्याच मित्रांनी आपल्याला प्रचंड दुखावल्याचेदेखील जाणवते. तेव्हा अनेकांना हा प्रश्न पडला असेल माझे हे मित्र खरे आहेत की मैत्रीचा दिखावा करत आहेत.

परंतु हे कसे ओळखणार की आपले हे मित्र खरे आहे नाही? चला तर जाणून घेऊयात आपले मित्र जर मैत्रीचा दिखावा करत असतील तर ते कसे वागतात. अशा खोट्या मित्राची लक्षणे काय असतात.

१. असे मित्र फक्त तेव्हा तुमच्याबरोबर असतात जेव्हा त्यांना गरज असते, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते तुमच्याबरोबर असत नाहीत.

२. तुमचे बोलणे, कृती त्यांच्या आयुष्याभोवती गुंफलेल्या दिसून येतील, पण गोष्टी तुमच्या आयुष्यासंबंधी येतील तेव्हा त्याविषयी फार इंटरेस्ट दाखवला जाणार नाही. एकतर्फी नाते तयार होईल. तुम्हाला काय वाटते, काय विचार करता, तुमच्या आयुष्यात काय चालले आहे याने त्यांना काही फरक पडणार नाही.

३. तुमच्या मतांचा आदर केला जाणार नाही. ४. इतरांसमोर तुमचा अपमान करत असतील तर ते तुमचे खरे मित्र असू शकत नाहीत. ५. खोटे मित्र तुमच्यासमोर एक तुमच्यापाठीमागे एक असे वागू शकतात. तुम्ही त्यांना विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी ते इतरांना सांगत असतात.

६. तुमच्याबद्दल अफवा पसरवतात.

७. तुमच्यापाठीमागे इतरांजवळ वाईट बोलतात.

८. खोट्या मित्रांची मैत्री यावर टिकलेली असेल की त्यांना तुम्ही काय देऊ शकता. या मैत्रीतून त्यांना काय मिळेल यावर त्यांची मैत्री टिकलेली असेल

९. ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करुन त्यांना हव्या त्या गोष्टी तुमच्या कडून करवून घेऊ शकतात.

१०. तुमच्या व्यक्तीगत अवकाशात ढवळाढवळ करतील. मैत्रीतील सीमारेषेंचा विचार करणार नाहीत.

११. तुमचे खोटे मित्र असतीत त्यांना तुम्ही यशस्वी झालेले आवडणार नाही.

१२. तुम्हाला त्रास होईल असे ते वागू शकतात.

जर तुम्हाला तुमच्या मित्राकडून अशी वागणूक मिळत असेल, तर तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. तुम्ही अशा मित्रांच्या वागण्याचे बारिक निरिक्षण करा आणि तुमचे मित्र खरंच त्यांच्या फायद्यासाठी तुमच्याबरोबर राहत असतील तुम्ही भावनिक गुंतवणूक टाळा. यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. अशा मित्रांचे आपल्या आयुष्यातून जाण्याने तुम्हाला त्रास होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT