Krishna Janmashtami 2023:
Krishna Janmashtami 2023:Dainik Gomantak

Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीला चार चौघात उठून दिसण्यासाठी, अशी करा पारंपारिक वेशभूषा

कृष्ण जन्माष्टमीला खास दिसण्यासाठी तुम्ही पारंपारिक वेशभूषा करू शकता.
Published on

Krishna Janmashtami Special Look: जन्माष्टमी हा सण प्रत्येकासाठी खूप खास आहे. कारण याच दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. या दिवशी कृष्णाचा जन्म मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 6-7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

इतकंच नाही तर अनेक ठिकाणी जन्माष्टमीच्या निमित्ताने कान्हा घरोघरीही खास पद्धतीने सजवला जातो. जन्माष्टमीला कपडे घालण्यासाठी महिलांकडे अनेक पर्याय असतात, पण पुरूषांनी या दिवशी कपडे कसे घालायचे हे समजत नाही.

जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी खास आणि वेगळ्या पद्धतीने तयारी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला खास लूक कॅरी करता येईल.

  • प्रिंटेड टी-शर्ट्स

आजकाल कृष्णाचा फोटो असलेले टी-शर्ट्स विशेषतः जन्माष्टमीनिमित्त मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही काही हटके घालण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

  • कान्हा लूक

जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा विचार करत असाल किंवा काहीतरी खास परिधान करायचे असेल तर तुम्ही कान्हा लूक देखील कॅरी करू शकता. तुम्ही यामध्ये खूप गोंडस दिसाल.

Krishna Janmashtami 2023:
Shravan Somvar: तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण सोमवारी करावे 'हे' उपाय
  • धोती आणि कुर्ता

जन्माष्टमीच्या दिवशी पुजा करताना धोती कुर्ता घालण्याला खास महत्व आहे. पुरुषांसाठी धोती कुर्ता हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मार्केटमध्ये अनेक धोती कुर्ता सहज मिळतात. तुम्ही खरेदी करून धोती कुर्ता सहज घालू शकता. या पूजेसाठी पिवळ्या रंगाचा कुर्ता शुभ मानला जातो.

  • कुर्ता आणि पायजमा

मुलांना कुर्ता पायजमा घालायला आवडतो. फिटिंगचा कुर्ता आणि पायजमा परिधान केल्याने तुमचा लुक वेगळा आणि स्टायलिश बनेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणताही लाइट रंगाचा कुर्ता घालू शकता.

  • जीन्स आणि कुर्ता

जर तुम्ही कुर्ता आणि पायजमा घालण्यात कम्फर्टेबल नसाल तर जीन्ससोबत शॉर्ट कुर्ता घालून तुम्ही क्लासी लुक कॅरी करू शकता. लाइट रंगाचा कुर्ता आणि डेनिम जीन्स तुम्हाला लुक पूर्ण करण्यात मदत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com