8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

8th Pay Commission Meeting: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार असून, या आठवड्यात आयोगाची बंगळुरूमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.
8th Pay Commission Meeting
8th Pay Commission MeetingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार असून, या आठवड्यात आयोगाची बंगळुरूमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. 7 आणि 8 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधी आयोगासमोर आपल्या मागण्या आणि समस्या मांडणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बंगळुरू बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

या बैठकीत वेतनरचनेपासून भत्ते आणि पेन्शनपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि पेन्शनमधील सुधारणा यांसारख्या मागण्या आयोगासमोर मांडल्या जाऊ शकतात. कर्मचारी संघटना आपल्या अपेक्षा आणि विद्यमान वेतन व्यवस्थेतील अडचणी आयोगाला सांगणार आहेत.

8th Pay Commission Meeting
Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

युनिक मेमो आयडी असणाऱ्यांनाच प्रवेश

बंगळुरू बैठकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संबंधित स्टेकहोल्डर्सना 18 सप्टेंबरपर्यंत युनिक मेमो आयडी घेणे आवश्यक होते. ही आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच बैठकीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे आयोगासमोर अधिकृतपणे आपली बाजू मांडण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

ऑक्टोबरमध्ये मुंबईतही बैठक

बंगळुरूनंतर 8व्या वेतन आयोगाची आणखी एक महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. 22 आणि 23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी स्टेकहोल्डर्सना 10 ऑक्टोबरपर्यंत युनिक मेमो आयडी घेण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी आयोगाच्या दिल्ली आणि लखनऊसह विविध शहरांमध्ये बैठका झाल्या आहेत.

फिटमेंट फॅक्टर 4 करण्याची मागणी

8व्या वेतन आयोगासमोर फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणीही चर्चेत आहे. काही कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 4 ठेवण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास सध्याचे किमान बेसिक वेतन 18,000 रुपयांवरून 72,000 रुपये होऊ शकते. मात्र, हा केवळ संघटनांकडून करण्यात आलेला प्रस्ताव असून अंतिम निर्णय आयोग आणि त्यानंतर सरकारच्या प्रक्रियेनुसार होईल.

8th Pay Commission Meeting
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

DA वर्षातून चार वेळा वाढवण्याची मागणी

महागाई भत्त्याबाबतही कर्मचारी संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा बदल केला जातो. मात्र, काही संघटनांनी वर्षातून चार वेळा DA वाढवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर DA 25 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर तो बेसिक पेमध्ये विलीन करण्याची मागणीही आयोगासमोर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 60 टक्के असल्याचे या माहितीत नमूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com