Summer Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Tips: प्रेग्नेंट महिलांनी 'या' फळांचे सेवन करावे

गरोदरपणात महिलांनी उन्हाळ्यात कोणती फळे खावीत हे जाणून घेउया.

दैनिक गोमन्तक

Summer Tips: गर्भधारणेचे नऊ महिने प्रत्येक महिलांसाठी खूप महत्वाचे असते. जी भावनिक आणि शारीरिक चढ-उतारांनी भरलेली असते. परंतु महिलांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासांपैकी हा एक प्रवास आहे.

गर्भधारणेदरम्यान महिलेने तिच्या शरीरावर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. पौष्टिक आहारासह निरोगी जीवनशैली राखण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया गरोदरपणात महिलांनी उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवी.

  • गरोदर महिलांनी उन्हाळ्यात (Summer) येणारी फळे जरूर खावीत. हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर समृध्द असतात. ते तुम्हाला ऊर्जा देतात, जंक फूड टाळण्यासाठी तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण ठेवतात आणि ते गरोदरपणात त्वचा (Skin) आणि केसांसाठी उत्तम असतात.

  •  खरबूज आणि टरबूज ही पाण्याने समृद्ध फळे आहेत आणि ते तुमची हायड्रेशन पातळी उच्च ठेवतात.

  • सफरचंद लोह आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.

apple
  • पीच, प्लम्स, किवी आणि लिंबू भरपूर व्हिटॅमिन सी प्रदान करतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि लोह शोषण्यास मदत करतात.

  • पेरूमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते.

Fruits

गर्भधारणेचे नऊ महिने प्रत्येक महिलांसाठी खूप महत्वाचे असते. या काळात बाळाला सामावून घेण्यासाठी शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेतील बदल महिलांनाही त्रास देतात आणि उन्हाळ्यात गर्भधारणेची लक्षणे अधिक वेदनादायक वाटतात.

या बदलांमुळे गर्भवती महिलेला अस्वस्थ वाटू शकते आणि उष्णता वाढल्यावर ही स्थिती आणखी वाईट होऊ शकते. मळमळ आणि उलट्या, अपचन, गॅस, पोट फुगणे, भूक न लागणे या समस्या या ऋतूत अधिक वाढतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT