Dahi Wada Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dahi Vade Recipe: घरीच बनवा मऊ दही वडे

दैनिक गोमन्तक

Perfect Dahi Vade: दही वडा म्हटलं की लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. कोणत्याही घरात दही खायला सर्वांनाच आवडते. आणि दह्यासोबत काही चुरचुरीत किंवा कुरकुरीत खायला मिळालं तर त्याची मजा काही वेगळीच असते. येथे आम्ही तुम्हाला दही वडा चविष्ट बनवण्याची सोपी आणि मजेदार पद्धत सांगणार आहोत... (Dahi Vade Recipe)

दही वड्यासाठी लागणारे साहित्य

अर्धा किलो उडीद डाळ

अर्धा किलो मूग डाळ

एक चिमूटभर बेकिंग सोडा

1 छोटे आले किसलेले

1 टीस्पून काळी मिरी पावडर

2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या

4 चमचे किसलेले नारळ

टीस्पून लाल तिखट

टीस्पून भाजलेले जिरे

चिंचेची गोड चटणी

2 कप दही फेटले

1 टीस्पून काळे मीठ

चवीनुसार मीठ

तेल आवश्यकतेनुसार

दही वडे कसे बनवायचे

उडीद आणि मूग डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवा.

यानंतर दोन्ही डाळींचे साल काढून पाणी काढून टाकावे.

आता दोन्ही डाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या

डाळीच्या पेस्टमध्ये किसलेले खोबरे, चिरलेली हिरवी मिरची, आले, बेकिंग सोडा आणि मीठ मिसळा.

कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.

तेल गरम झाल्यावर त्यात सारणाचा मोठे गोल आकाराचे गोळे करून ते वडे तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

आता एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात तळलेले वडे टाका.

वडे मऊ झाल्यावर प्रत्येक वडा तळहातावर दाबा आणि त्यातील पाणी पिळून घ्या.

आता या वड्यांमध्ये दही घाला. दह्याच्या वरती जिरेपूड, लाल तिखट, काळे मीठ, चिंचेची चटणी, कोथिंबीर आणि काळ मीठ घालून सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT