Food For Heart Dainik Gomantak
लाइफस्टाइल

5 Foods For Heart: हार्टअटॅकला करा बाय बाय! आजच 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

हृदय मजबूत ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

5 Food Diet Against Heart Attack: हृदय हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. हे शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त आणि पोषक तत्वांचा पुरवठा करते.

हृदय निरोगी असेल तरच शरीरही निरोगी राहते. निरोगी हृदय शरीराला रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांपासून वाचवते.

हृदय निरोगी नसेल तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. हृदय मजबूत ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे हृदय सुरक्षित ठेवतात. आज आम्ही तुम्हाला अशा पाच पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकतात.

1. हिरव्या पालेभाज्या:

तज्ञांच्या मते, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या जीवनसत्त्वे, नायट्रेट्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांच्या पेशी निरोगी होतात आणि बीपी नियंत्रित राहतो, ज्यामुळे आपले हृदय मजबूत होते.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हृदयरोगांशी लढते. निरोगी हृदयासाठी हिरव्या पालेभाज्यांच्या आपल्या आहारात समावेश करा.

2. सुका मेवा:

अक्रोड आणि बदाम यांसारखा सुका मेवा हृदयाला मजबूत करतात. ते फायबर आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहेत, जे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि पोटाची चरबी कमी करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. याच्या नियमित सेवनाने हृदय निरोगी राहते.

3. सोया प्रोटीन:

सोया प्रोटीन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उच्च फायबर आणि उच्च प्रथिने असलेले सोया प्रोटीन हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यामुळे हृदयविकार टाळण्यास मदत होते. सोया प्रोटीनमुळे हृदय मजबूत आणि निरोगी राहते. तसेच कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत होते.

4. ब्लूबेरी:

ब्लूबेरीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट मानले जातात. या स्वादिष्ट फळामध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी असते. त्याचा आहारात नियमित समावेश करून हृदय निरोगी आणि आजरांपासून दूर ठेवता येते.

5. संपूर्ण धान्य:

तांदूळ, ओट्स आणि बार्ली यांसारखे संपूर्ण धान्य हृदयाला मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यांच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, त्यामध्ये असलेल्या इतर पोषक तत्वांसह शरीर निरोगी होते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा आहारात समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT