Skin Care Tips: रात्री झोपताना चेहऱ्याला लावा 'हे' तेल; सगळ्या समस्या होतील गायब

जर तुमची त्वचा खडबडीत, निर्जीव वाटत असेल, त्यात मऊपणा नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावावे.
Skin Care Tips
Skin Care TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Coconut Oil For Skin Care: चेहऱ्याची त्वचा दीर्घकाळ निरोगी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्वचेला योग्य काळजी आणि पोषण मिळाले नाही तर ती निर्जीव, निस्तेज आणि कोरडी दिसू लागते.

उन्हाळ्यातही त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती कोमेजलेली दिसू लागते. तसेच सन टॅनमुळे त्वचा काळी पडते.

जर तुमची त्वचा खडबडीत, निर्जीव वाटत असेल, त्यात मऊपणा नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावावे.

होय, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. ते त्वचेवर लावल्याने त्वचेला पोषण तर मिळतेच, सोबतच ती मुलायमही होते. चला जाणून घेऊया, रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने कोणते फायदे होऊ शकतात.

Skin Care Tips
Daily Horoscope 01 May: बोलण्यावर ठेवा ताबा नाहीतर बायकोशी होईल भांडण; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे फायदे

खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे तेल त्वचेवर लावल्यावर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे सूज कमी होऊ शकते. चेहऱ्यावर जखम झाली असल्यास ती लवकर बरी होण्यास मदत होते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याच्या गुणधर्मांमुळे, हे तेल त्वचेचे अनेक प्रकारे संरक्षण करते.

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळाचे तेल एटोपिक डर्माटायटीस सारख्या पुरळ टाळण्यास आणि उपचार करण्यास मदत करू शकते. आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की खोबरेल तेल लावल्याने UVB किरणांमुळे होणारी जळजळ देखील कमी होऊ शकते.

केस जाड, काळे आणि मुळांपासून मजबूत ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे, ज्यामुळे त्वचेवरील समस्या दूर होतात. जर तुमची त्वचा खूप कोरडी राहिली असेल तर रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने मसाज करा. सकाळी तुम्हाला दिसेल की तुमची त्वचा खूप गुळगुळीत आणि मऊ वाटत आहे.

खोबरेल तेल त्वचेचे कोलेजन वाढवते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होण्याची समस्याही यामुळे कमी होते. जर तुम्हाला कमी वयात वृद्धत्वाची चिन्हे टाळायची असतील तर तुम्ही त्वचेवर खोबरेल तेलाचा अवश्य वापर करा.

सुरकुत्या, पिगमेंटेशन या समस्यांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य नष्ट झाले असेल तर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. या तेलामध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्म वृद्धत्वाच्या लक्षणांपासून बचाव करतात.

जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणत्याही प्रकारचे संक्रमण असेल तर खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. मात्र ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी त्याचा अतिरेक करणे टाळावा.

जर तुम्ही खोबरेल तेल लावत असाल तर थोडेसे तेल घ्या आणि ते थेट त्वचेवर किंवा केसांना लावा. त्वचा सहसा नारळाचे तेल लवकर शोषून घेते, त्यामुळे तुमची त्वचा चिकट वाटत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com