Diwali Decoration Ideas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Decoration Ideas: 'हे' छोटे बदल घराला देतील नवीन लूक, नक्की ट्राय करा

तुम्ही कमी खर्चात देखील घराला नवा लूक देऊ शकता.

Puja Bonkile

Diwali Home Decoration Tips: दिवाळीची तयारी काही दिवसांपुर्वीच सुरू होते. यामध्ये घराच्या सजावटीला अधिक महत्व दिले जाते. घर सुंदर बनवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. दिवाळीपुर्वी घराला कलर करतात तर घरातील काही बदल करतात. पण तुम्ही पुढील टिप्स वारून कमी खर्चात घराला नवा लूक देऊ देऊ शकता.

  • पडदे बदलावे

दिवाळीत घराला नवा लूक देण्यासाठी तुम्ही घरातील जुने पडदे बदलून नवे लावू शकता. यामुळे घराला अगदी नवा लूक मिळेल. जर पडदे विकत घ्यायचे नसेल तर तुम्ही घरातील पडदे अदला बदल करू शकता. जसे की हॉलमधील पडदे किचनमध्ये लावू शकता किंवा सर्व पडदे मिक्स करून लावू शकता.

  • घरात झाडे लावावी

दिवाळीत घराला नवा लूक द्यायचा असेल तर तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात सुंदर अशी रोपे ठेऊ शकतात. यासाठी तुम्ही सुंदर फुलदाणीचा देखील वापर करू शकता. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घराला सुंदर लूक देखील मिळतो.

  • लाइटिंग

दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. तुम्ही घरात रंगीबेरंगी लाइटिंगने घर सजवू शकता. सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या लाइटिंग उपलब्ध आहेत. यामुळे घराला अतिशय आखर्षक लूक मिळतो.

  • पेंटिंग आणि फुलांचा वापर

यंदा दिवाळीत तुम्ही घरात सुंदर पेटिंग आणि फुलांचा वापर करून सजावट करू शकता. यामुळे तुमच्या घराला नावा लूक मिळेल. तुम्ही घरी कागदाचा वापर करून फुलं बनवु शकता.

  • फर्निचरची जागा बदलावी

दिवाळीत घरातील हॉलमधील फर्निचरची जागा बदल्यास तुम्हाला तुमचेच घर नव्या सारखे वाटेल. हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही जर वर सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यास घर नव्यासारखे दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT