Men Stamina Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Men Stamina Diet: विवाहित पुरुषांचा 'स्टॅमिना' वाढवणारे पाच पदार्थ, आजच ट्राय करा

यासाठी पाच घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचे नियमित सेवन केल्यास पुरुषांचा स्टॅमिना वाढू शकतो.

Pramod Yadav

Men Stamina Diet: बदलेली जीवनशैली आणि वाढते वय यामुळे पुरुषांच्या शरीरावर विविध परिणाम होत आहेत. विशेषतः विवाहित पुरुषांचा उत्साह कमी होऊ लागला आहे. याचा त्यांच्या खाजगी आयुष्यावर परिणाम होऊ लागला आहे, यामुळे जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. यामुळे पुरुषांमध्ये न्यूनगंड येतो तसेच, निराशेचेही बळी ठरतात.

यासाठी पाच घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचे नियमित सेवन केल्यास पुरुषांचा स्टॅमिना वाढू शकतो.

आहारात ब्रोकोलीचा समावेश करा खा

वयाची चाळीशी ओलांडलेल्या पुरूषांनी आहारात ब्रोकोलीचा समावेश करावा. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी, फायबर, कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. तुम्ही उकडलेली किंवा कच्ची ब्रोकोली खाऊ शकता. आठवड्यातून 2-3 वेळा अर्धा कप ब्रोकोली खाणे स्टॅमिना वाढीसाठी चांगले मानले जाते. (Men Stamina Diet)

मजबूत हाडांसाठी दूध

शरीराची हाडे मजबूत ठेवण्यासाठी रोज एक ग्लास दूध प्यावे. दुधात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते आणि त्यामुळे हाडे मजबूत होतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दूध थंड किंवा गरम पिऊ शकता. दोन्ही प्रकारे शरीराला समान फायदा होतो.

बदाम

शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी बदाम हा सर्वोत्तम पर्याय मानला गेला आहे. यामध्ये व्हिटॅमिन-ई, फायबर आणि प्रोटीन आढळतात. यामुळे शरीराची पचनसंस्था, त्वचा आणि हृदय तंदुरुस्त राहते. यात अनसॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात, याच्या सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका देखील नसतो. (Men Stamina Diet)

पोटासाठी सोयाबीन फायदेशीर

वयाच्या 40 व्या वर्षी पोटदुखीच्या तक्रारी आणि पचनसंस्था संबधित समस्या समोर येतात. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. त्यात मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स आढळतात. विवाहित पुरुषांनी आठवड्यातून 1-2 वेळा याचे सेवन केल्याने आश्चर्यकारक फायदे मिळतात.

अंडी खाल्ल्याने मेंदूला ताकद मिळते

वृद्धत्वासोबत मेंदूलाही थकवा येऊ लागतो. मेंदूसाठी अंड्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अंड्यामध्ये 4 ग्रॅम पर्यंत अमीनो ऍसिड आढळते, ज्याचे सेवनामुळे स्नायूंना बळकटी मिळते. पिवळ्या भागात आढळणाऱ्या कोलीन नावाच्या जीवनसत्वामुळे मेंदू शक्ती मिळते असे मानले जाते. (Men Stamina Diet)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT