Pramod Yadav
'महिला दिना'प्रमाणेच, दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' साजरा केला जातो.
पुरुषांसाठी सकारात्मक विचार आणि आरोग्याबाबत जागरुकता यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठात 1999 मध्ये इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी, त्यांच्या वडिलांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
भारतात 19 नोव्हेंबर 2007 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
पुरूषांची तंदुरुस्ती, आरोग्य, संघर्ष आणि पुरुष वर्षानुवर्षे सामोर जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला देणे हा आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे.
"पुरुष आणि मुलांना मदत" अशी यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम आहे.
जगभरातील 80 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.