Tabassum Death: भारतातील पहिल्या टॉक शोच्या सूत्रसंचालिका ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन

दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोच्या सूत्रसंचालिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली.
Actress Tabassum Passed Away
Actress Tabassum Passed AwayDainik Gomantak

Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री व ख्यातनाम सूत्रसंचालिका तबस्सुम गोविल (78) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान तबस्सुम गोविल यांनी अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम यांनी 1947 मध्ये मेरा सुहाग बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले होते. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोच्या सूत्रसंचालिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

(Veteran actor Tabassum, best known for child roles and Bollywood talk show, dies of cardiac arrest)

Actress Tabassum Passed Away
IFFI53 Opening Ceremony: इफ्फीचा काउंटडाऊन सुरू, सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी गोवा सज्ज

तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. "शुक्रवारी रात्री 8.40 च्या सुमारास तबस्सुम यांना हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांचे निधन झाले. त्या निरोगी होत्या. आमच्या शोसाठी 10 दिवसांपूर्वी शूटिंग केल्यानंतर, पुढच्या आठवड्यात पुन्हा शूट करणार होते. पण हे अचानक घडले."

बालकलाकार म्हणून 1947 मध्ये तबस्सुम यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 1972 ते 1993 या काळात लोकप्रिय दूरदर्शन सेलिब्रिटी टॉक शो फूल खिले हैं गुलशन गुलशन याचे सूत्रसंचालन केले. तबस्सुम यांनी बाल कलाकार म्हणून नर्गिस (1947) या चित्रपटातून पदार्पण केले, त्यानंतर मेरा सुहाग (1947), मंझधर (1947) आणि बारी बहन (1949) नंतर दीदार (1951) स्वर्ग (1990) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com