Easter Sunday Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Easter Sunday Recipe: चॉकलेट स्पंज केकसह बनवा ईस्टर संडे स्पेशल !

इस्टरच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांसाठी चॉकलेट स्पंज केक बनवा.

दैनिक गोमन्तक

Easter Sunday Recipe: ख्रिश्चन समाजातील लोक ईस्टर हा सण साजरा करतात. गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी इस्टर सण साजरा केला जातो. असे मानले जाते की गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी प्रभु येशूचे पुनरुत्थान झाले होते, या घटनेला इस्टर संडे म्हणून देखील ओळखले जाते.

ख्रिश्चन समाजासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. ईस्टर घरी साजरी करायची असेल आणि पाहुणेही येत असतील, तर तोंड गोड करण्यासाठी चविष्ट चॉकलेट स्पंज केक तयार करुन व्हा व्हा मिळवु शकता.

चॉकलेट स्पंज केक मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि मोठ्यांनाही त्याची चव आवडते. जर तुम्हालाही चॉकलेट स्पंज केक आवडत असेल तर तुम्ही अगदी सोपी रेसिपी फॉलो करून चविष्ट चॉकलेट स्पंज केक घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.

  • चॉकलेट स्पंज केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा - 1 कप

कोका पावडर - 1/4 कप

दही - 1 कप

कॉफी पावडर - 1टीस्पून

बेकिंग सोडा - 1/2 टीस्पून

बेकिंग पावडर - 1/1/4टीस्पून

व्हॅनिला एसेन्स - 1 टीस्पून

बटर - 1/2 कप

डार्क चॉकलेट - 1 क्यूब

साखर - 3/4 कप

व्हिप क्रीम - आवश्यकतेनुसार

मीठ - 1 चिमूटभर

चॉकलेट स्पंज केकची रेसिपी

चॉकलेट स्पंज केक बनवायचा असेल तर प्रथम एक भांडी घ्या आणि त्यात दही घाला. आता दह्यामध्ये साखर घाला, चांगले मिक्स करा आणि विरघळण्यासाठी सोडा. आता मैदा आणि कोको पावडर दुसऱ्या भांड्यात चाळून घ्या. भांड्यात चिमूटभर मीठ टाकून हे पदार्थ वेगळे ठेवा. दह्यात साखर विरघळल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिक्स करून 5 मिनिटे ठेवा.

5 मिनिटांनंतर त्यात बटर आणि कॉफी पावडर घाला आणि चमच्याने ढवळत असताना मिक्स करा. आता चमच्याच्या साहाय्याने पिठात थोडे थोडे दही ओता आणि चमच्याने मिक्स करा. सर्व दही पिठात घालून मिक्स करावे. आता केक पॅन घ्या आणि त्यावर बटर/तेल लावा. नंतर तयार मिश्रण भांड्यात ठेवा आणि भांडी ओव्हनमध्ये ठेवा आणि सुमारे अर्धा तास 180अंशांवर बेक करा.

चॉकलेट स्पंज केक अर्ध्या तासात चांगला बेक होईल. बाहेर काढण्यापूर्वी एकदा तपासा. आता तुमचा टेस्टी चॉकलेट स्पंज केक तयार आहे. आता व्हीप क्रीमच्या मदतीने सजवा आणि क्रीमभोवती डार्क चॉकलेट क्रश लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT