Easter Sunday 2023
Easter Sunday 2023Dainik Gomantak

Easter Sunday 2023: इस्टर संडे आजच का साजरा केला जातो, वाचा एका क्लिकवर

इस्टर हा खऱ्या अर्थाने ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचा दिवस आहे.
Published on

Easter Sunday 2023: ख्रिस्ती बांधवांनी नुकताच गुड फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे साजरा केला आहे. आज (9 एप्रिल) सर्वत्र इस्टर संडे म्हणुन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर ख्रिश्चन समुदायासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा मानला जतो.

  • काय आहे इस्टरची कहाणी

प्रभू येशू ख्रिस्तांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांना सुळावर चढवण्यात आले होते. तो दिवस शुक्रवारचा होता आणि त्यांच्या बलिदानासाठी हा दिवस किंवा या दिवसाला गुड फ्रायडे असे संबोधले गेले.

पण रविवार हा इस्टर म्हणून साजरा करण्यात येतो. शुक्रवारी प्रभूंनी बलिदान दिल्यावर ते रविवारी पुन्हा एकदा जिवंत होऊन आले होते, असा दाखला आहे. त्यामुळेच इस्टर हा खऱ्या अर्थाने ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचा दिवस आहे.

Easter Sunday 2023
Aam Panna Recipe: उन्हाळ्यात बॉडी रिफ्रेश करते कैरीचं पन्हं,घरीच घ्या आस्वाद

प्रभूंना मृत्यूदंड दिल्यावर घरोघरी त्यांचे स्मरण केले जात होते. तेव्हा एक महिला अचानक लोकांना बोलली की प्रभू येशू जिवंत झाले आहेत. हे ऐकून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा ती महिला म्हणाली की, जेव्हा मी प्रभूंच्या थडग्यावर प्रार्थना करण्यासाठी गेले, तेव्हा तिथला दगड जागेवर नव्हता आणि कबरीत प्रभूंचा देह नव्हता. इतक्यात एक पुण्यात्मा तिथे प्रकट झाली आणि त्यांनी मला प्रभू जिवंत आहेत असे सांगितले.

या नंतर खरोखरच जिवंत येशू ख्रिस्त लोकांमध्ये आले आणि ते 40 दिवस समाजात राहिले. या दरम्यान त्यांनी धर्माचे ज्ञान आपल्या अनुयायांना दिले आणि त्यानंतर 40 दिवसांनी येशू ख्रिस्त स्वर्गात निघून गेले असे सांगितले गेले आहे.

त्यामुळे रविवारचा इस्टर ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि पवित्र दिवस आहे. यादिवशी घरोघरी किंवा चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूची प्रार्थना करण्यात येईल.

  • अंडी भेटवस्तू का देतात?

इस्टरच्या दिवशी अंड्याला विशेष महत्त्व असते. इस्टर सणाला ख्रिश्चन धर्माचे लोक अंडी सजवतात, अंड्याच्या आकाराची चॉकलेटस बनवतात आणि एकमेकांना भेटवस्तू म्हणूनही अंडी देतात. ज्या प्रमाणे अंडं हे जन्माचं प्रतीक आहे आणि ते लोकांना एका नव्या सुरूवातीचा संदेश देतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com