Electricity Meter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Magnet Reduce Electricity Bill: खरंच, चुंबक वापरल्याने विजेचे बिल कमी येते? वाचा नेमकं काय आहे सत्य

चुंबक वापरल्याने विजेचे बिल कमी येते असा दावा सोशल मिडीयावर केला जात आहे

Rajat Sawant

Fact Check On Magnet Reduce Electricity Bill: विजेचं बिल तुम्हाला जास्त येत आहे कां? तर वीजबिल कमी करण्यासाठी चुंबकाचा वापर करता येतो अशी चर्चा होत आहे. सोशल मिडीयावर याबाबत बरेच दावे केले जात आहेत. हा जुगाड आपले काम करू शकेल का, अशी शंका लोकांमध्येही निर्माण झाली आहे.

तर हा जुगाड खरंच शक्य आहे का? या दाव्यांमागील खरे सत्य काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर या दाव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी पाहूया.

वीज मीटरवर चुंबक लावल्यास विजेचा वापर थांबेल, असा दावा सोशल मिडीयावर केला जात आहे. चुंबकाचा वापर केल्याने तुमचे वीज बिल देखील कमी होईल असा दावा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

तुम्ही जर असा प्रयत्न करणार असाल तर थांबा. कारण वीज मीटरमध्ये छेडछाड करणे हा गुन्हा आहे. वीज कायदा 2003 अन्वये वीज चोरी आणि मीटरमध्ये छेडछाड केल्यास शिक्षेची तरतूद आहे.

कलम 135 अन्वये नियमांचे उल्लंघन केल्यास वीज चोरी किंवा नुकसानीच्या तिप्पट दंड आकारला जाऊ शकतो.

वीज बिल कमी करण्यासाठी चुंबकाचा वापर करा असा सोशल मिडीयावर दावा केला जात आहे. या दाव्याचा तपास केला असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून येते. कारण वीज मीटरच्या वायरिंगमुळे त्याभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते.

परमानेंट मैग्नेटिक फील्डच्या तुलनेत इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड अधिक शक्तिशाली आहे त्यामुळे मीटरवर चुंबकाचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच अलीकडे डिजिटल आणि स्मार्ट मीटर आले आहेत, त्यामध्ये छेडछाड करणे खूप कठीण काम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT