Astro Tips Dainik Gomantak 
लाइफस्टाइल

Astro Tips: घरातील अशांती दूर करण्यासाठी 'हे' उपाय करा

नकळत आपण अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो

गोमन्तक डिजिटल टीम

प्रत्येकाला आयुष्यात सुख, शांती हवी असते. यासाठी अनेक उपाय केले जातात, देवाची प्रार्थना केली जाते, पण, नकळत आपण अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे आपण पूर्णपणे गोंधळून जातो, आणि नशिबाला दोष देतो.

याचे कारण दैनंदिन जीवनात आपण नकळत अशा काही चुकीच्या गोष्टी करत असतो, ज्याची आपल्याला जाणीव नसते. आणि त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या गोष्टींबाबत ज्योतिषशास्त्रात (Astrology) काही नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्यास, तुम्हाला आयुष्यात सुख, शांती मिळेल.

खालील उपाय ठरतील फायदेशीर

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर रविवारी उंबराच्या झाडाची पूजा करा. यामुळे तुम्हाला धनलाभ होईल.

रोज सूर्योदयाच्या वेळी पूर्वेला तोंड करून रुद्राक्षाच्या माळा घालून सूर्यासमोर गायत्री मंत्राचा जप केल्याने नशिब उजळते.

पूजेत वापरल्या जाणार्‍या फुलांचा किंवा इतर साहित्याचा अवमान करू नका. सुकलेली फुले वाहत्या पाण्यात फेकून द्या. जर ते नसेल तर खड्डा खोदून त्यात टाका.

वास्तुशास्त्रानुसार नेहमी पूर्व दिशेला बसून भोजन केले तर जीवनात सुख प्राप्ती होते.

घरी रोज नित्यनेमाने पूजा करावी. पूजा केल्यानंतर रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी तुमच्या कुलदेवाच्या मंदिरात जा. यामुळे तुमच्या मनालाही शांती मिळेल.

महादेवाचा रुद्र अष्टाध्यायी अभिषेक केल्याने भाग्याचे बाधा दूर होतात. पूजेव्यतिरिक्त तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरामध्ये जेथे पूर्व आणि उत्तर दिशा एकत्र येतात. दररोज स्नान केल्यानंतर त्या कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता संपून घरात आनंदाचे वातावरण असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT