Male Menopause Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Male menopause: जसा महिलांमध्ये मेनोपॉज तसा पुरूषांमध्ये असतो अँड्रोपॉज

लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष नाहीतर लैंगिक जीवनात येतील अडथळे

गोमन्तक डिजिटल टीम

Male menopause: महिलांमध्ये जसा एका ठराविक वयानंतर मेनोपॉज (रजोनिवृत्ती) येत असतो तसेच काहीसे हार्मोनल बदल पुरषांच्याही शरीरातही वय वाढताना होत असतात, तशी लक्षणे दिसत असतात. याला पुरषांचा मेनोपॉज म्हणता येईल. वैद्यकीय भाषेत याला अँड्रोपॉज (Andropause) असे म्हणतात.

फर्टिलिटी कन्सल्टंटच्या मते, महिलांच्या मेनोपॉजच्या तुलनेत अँड्रोपॉज पुर्णतः वेगळा असतो. जवळपास ३० टक्के पुरूषांमध्ये वयाच्या पन्नाशीत टेस्टोस्टेरॉन च्या कमतरतेमुळे अशी लक्षणे दिसतात. अँड्रोपॉजमध्ये पुरषांमध्ये टेस्टोस्टेरॉन निर्मितीचा स्तर हळुहळु कमी होतो आणि वेळेनुसार वाढत जातो. अँड्रोपॉजनंतरही पुरूषांमध्ये शुक्राणू तयार होतात. महिलांमध्ये मेनोपॉज हा त्यांच्या बायोलॉजिकल क्लॉकचा अंत मानला जातो. तथापि, अँड्रोपॉजमुळे एखाद्या व्यक्तीची प्रजननक्षमतेत बाधा येत नाही. टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन पुरूषांच्या अंडकोषात निर्माण होते. वयाची तिशी ओलांडल्यानंतर टेस्टोस्टेरॉनचा स्तर दरवर्षी जवळपास एक टक्क्याने कमी होत जातो.

५० वर्षांहून अधिक वयाच्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कमी झाल्याने अँड्रोपॉज उद्भवत असतो. टेस्टोस्टेरॉनचा स्तर घटण्याला जाडी, मधुमेह, किडनीचे आजार, एचआयव्ही, भावनिक दबाब आणि सिमेटिडाईन, स्पिरोनोलॅक्टॉन, डिगॉक्सिन, ओपिओईड एनाल्जेसिक, अँटिफंगल औषधांचे सेवन अशी कारणे असू शकतात.

अँड्रोपॉजची लक्षणे

शरिरात चरबी जमा होणे, लैंगिक रोग, कामेच्छा (सेक्स ड्राइव) कमी होणे, झोप न लागणे, त्वचा बारीक होणे, त्वचा कोरडी होणे, चिडचिडपणा आणि मूड स्विंग, थकवा, उर्जा, उत्साह कमी असणे, शरिराचा वरील भाग गरम होणे (हीट फ्लॅशेस), एकाग्रतेची क्षमता कमी होते, खूप घाम येणे (हायपरहायड्रोसिस) ही अँड्रोपॉजची लक्षणे आहेत. वेगवेगळ्या लोकांमध्ये अँड्रोपॉजची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. याची कारणे कळत नाहीत तसेच बऱ्याचदा त्यावर उपचारही होऊ शकत नाहीत. तथापि, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

अँड्रोपॉजवर उपाय

रक्तात टेस्टोस्टेरॉन रिप्लेस करणे, हाच सध्या अँड्रोपॉजवरील सर्वसामान्य उपचार आहे. टेस्टोस्टेरॉन हे स्किन पॅचेस, कॅप्सुल्स, जेल्स आणि इंजेक्शन अशा अनेक रूपात आहे. तुमची जीवनशैली पाहून यातील उपचारपद्धती स्विकारता येते. उपचारपद्धतींबाबत मतभिन्नता असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT