कढीचे फोव Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goan Food: असे तयार करा कढीचे फोव

गोव्यात दिवाळीमध्ये चकली, चिवडा नाही तर पोह्यापासून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात.

Puja Bonkile

दिव्यांचा उत्सव म्हणजे दिवाळी. गोव्यात दिवाळी खूप आंनदांत साजरी केली जाते. येथे पोह्याचे विविध प्रकार तयार करून दिवाळीच्या दिवशी आस्वाद घेतला जातो. जसे दुधातले फोव, तकटले फोव, बटाटा फोव , कढी फोव आणि बरेच. आज आम्ही तुम्हाला गोव्यात घरोघर बनवल्या जाणाऱ्या 'कढीचे फोव' या पदार्थांची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:

लाल पोहा- 4 वाटी

चिंच - 2

लाल मिरची - 2 /4

गूळ पावडर - आवडीनुसार

नारळ खीस - आवडीनुसार

मिरी - 8/10

स्वादानुसार मीठ

कृती:

सर्वात प्रथम लाल पोहे अर्ध तास भिजत ठेवणे. नंतर एक पॅनमध्ये तेल तेल गरम करावे. नंतर त्यात मिरी आणि लाल मिरची भाजून घ्यावी. नंतर दुसरीकडे एक मिक्सरमध्ये ओलं खोबरं आणि भाजलेले मिरी व लाल मिरची, चिंचेची पेस्ट, गुळ , कोमट पाणी घालून चांगले मिश्रण तयार करावे. नंतर हे मिश्रण एका वाटीमध्ये गाळून घ्यावे. नंतर यात मीठ घालावे. नंतर भिजवलेल्या पोह्यांवर ही कढी टाकून 10 मिनिटे ठेवावे. तयार आहे कढीचे फोव. तुम्ही सुंदर काचेच्या प्लेटमध्ये हा पदार्थ सर्व्ह करू शकता.

ही रेसिपी तयार करण्यासाठी, लाल पोह्नयांचाच वापरा करावा, कारण ते पांढर्‍या पोह्यापेक्षा जास्त चवदार असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT