Fatty liver Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fatty liver: फॅटी लिव्हरवर रामबाण उपाय ठरणारं मधुमेहाचं औषध, संशोधनातून मोठा खुलासा

Type 2 diabetes treatment breakthrough: टाइप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे सेमाग्लुटाइड हे औषध फॅटी लिव्हर बरा करु शकते असे संशोधनातून निष्पण्ण झाले आहे.

Manish Jadhav

मधुमेहाचे औषध फॅटी लिव्हर आजार देखील बरा करु शकते. होय, चकित झालात ना... नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून यासंबंधी खुलासा झाला आहे. किंग्ज कॉलेज लंडनमधील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. फॅटी लिव्हर डिसीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. फॅटी लिव्हर रोगामुळे यकृताचे गंभीर नुकसान होण्याचा धोका देखील असतो. टाइप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे सेमाग्लुटाइड हे औषध फॅटी लिव्हर बरा करु शकते, असे संशोधनात सांगण्यात आले.

संशोधनात असे दिसून आले की, मधुमेहावरील औषधांमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. यामुळे यकृतात जमा होणारी चरबी देखील कमी होऊ लागते. या संशोधनात 800 लोकांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना मधुमेह होता. जेव्हा या लोकांना औषध देण्यात आले तेव्हा फॅटी लिव्हरची समस्याही कमी होऊ लागली. या लोकांना आठवड्यातून एकदा 2.4 मिलीग्राम सेमाग्लुटाइड किंवा प्लेसिबोचे इंजेक्शन देण्यात आले. 72 आठवड्यांच्या उपचारानंतर 64 टक्के लोकांच्या फॅटी लिव्हरमध्ये घट दिसून आली.

यकृतातील एंजाइममध्येही सुधारणा झाली

संशोधनात पुढे असेही दिसून आले की, सेमाग्लुटाइड घेणाऱ्या लोकांच्या यकृतातील एंजाइममध्ये सुधारणा झाली आणि त्यांचे वजन कमी होण्यास देखील मदत झाली. 72 आठवड्यांच्या उपचारानंतर या लोकांचे वजन 11 टक्क्यांनी कमी झाले. तथापि, काही लोकांमध्ये या औषधाचे दुष्परिणाम देखील दिसून आले. यामध्ये उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांचा समावेश होता. परंतु बहुतेक लोकांना औषधाचा फायदा झाला आणि फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणासारख्या समस्या देखील कमी झाल्या.

फॅटी लिव्हर आजारावर उपचार करण्यासाठी मधुमेहाच्या औषधांचा वापर करण्यासाठी भविष्यात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. यासोबतच, लोकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लोकांना दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, आहारात (Diet) तळलेले पदार्थ समाविष्ट करणे टाळा. पीठ, मीठ आणि साखर शक्य तितके कमी प्रमाणात घ्या आणि लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT