Dhanteras 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला सोनं-चांदीशिवाय तुम्ही 'या' 5 खरेदी करू शकता

Dhanteras 2023: सोनं, चांदी आणि भांडी यांच्या व्यतिरिक्त धनत्रयोदशीला तुम्ही पुढील गोष्टींची खरेदी करू शकता.

Puja Bonkile

Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोन्या-चांदीच्या वस्तू आणि भांडी नक्कीच खरेदी करतात आणि यामागची धारणा अशी आहे की या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली तर तिची किंमत 13 पटीने वाढते.

धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू घरी आणल्याने वर्षभर तुमच्या घरात सुख-समृद्धी लाभते. तसेच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहते. चला जाणून घेऊया या वस्तु कोणत्या आहेत.

मातीची मुर्ती

माती ही 5 तत्वांचे प्रतीक मानले जाते आणि असे मानले जाते की मातीच्या मूर्तीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी येते.

धनत्रयोदशीच्या दिवशी गणेश- माता लक्ष्मीच्या मूर्तीशिवाय कुबेराची मातीची मूर्तीही घरी आणावी. असे केल्याने तुमच्या घरात धनाची देवी आणि धनाची देवता वास करते आणि वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही.

झाडू

धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात नवा झाड खरेदी करू शकता. असे मानले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि धनत्रयोदशीला झाडू घरात आणल्याने तुमच्या घरात आर्थिक समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख-शांती नांदते.

एक गोष्ट लक्षात ठेवा की धनत्रयोदशीला नवीन झाडू आणण्यापूर्वी घरातील जुना झाडू काढून टाकावा.

धणे

धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण धणे घरात आणणे खूप शुभ असते. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पूजेच्या वेळी माता लक्ष्मी आणि कुबेर नक्कीच धणे अर्पण करावे.

असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही.

मीठ

धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून अख्खे मीठ नक्की खरेदी करावे. असे केल्याने तुमच्या घरातून आर्थिक संकट दूर होते आणि घरात धनाचा वर्षाव होतो.

मीठ आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि वाईट नजरेचा प्रभावही दूर होतो. धनत्रयोदशीला मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो, अशी मान्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT