Dengue Treatment Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dengue Treatment: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' औषधीयुक्त पानांचे करावे सेवन

ही 5 पाने डेंग्यूवर औषध म्हणून काम करतात.

Puja Bonkile

देशाच्या अनेक भागांमध्ये डेंग्युचे रूग्ण वाढले आहेत. डास चावल्यामुळे डेंग्यु होतो. यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवतो. डेंग्युमुळे लोकांचा मृत्युही होतो. प्लेटलेट्स अचानक कमी झाल्यामुळे वाढलेला रक्तस्त्राव हे याचे मुख्य कारण आहे. जर तुम्हालाही डेंग्यू झाला असेल आणि प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर तुम्ही या 5 औषधीयुक्त हिरव्या पानांचा वापर करू शकता.

ही 5 पाने खाल्ल्याने काही तासातच प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासोबतच प्लेटलेट्स वाढल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोकाही दूर होतो. ही 5 पाने डेंग्यूवर औषध म्हणून काम करतात. यातील पोषक तत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. जाणून घेऊया कोणती आहेत ही पाने आणि त्याचे सेवन कसे करावे.

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास कोणती लक्षणे दिसतात

नाकातुन रक्त येणे

हिरड्यांमधुन रक्त येणे

थकवा येणे

खोकलांना रक्त येणे

1) पपईची पाने

बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच पपईच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. पपई खाल्याने पचनशक्ती वाढवते. याच्या पानांचा काढा करून प्यायल्याने प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात. पपईच्या पानांचा रस दिवसातून किमान दोनदा प्यायल्यानेही ताप कमी होतो. हे आयुर्वेदातील चमत्कारिक औषधांपैकी एक आहे.

2) पेरूची पाने

पेरू खाणे आराग्यासाठी फायदेशीर असते. तसेच याच्या पानांमध्येही अनेक आरोग्यदायी फायदे लपलेले आहेत. पेरूच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. पेरूची पाने पाण्यात उकळावी. पाणी निम्मे झाल्यावर त्यात थोडी साखर घालून दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे. असे केल्याने प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात. डेंग्यूचा प्रभाव नाहीसा होतो.

3) तमालपत्र

मसाल्यांचा राजा मानले जाणारे तमालपत्र हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याचा औषधी वनस्पतींमध्ये समावेश होतो. जेवणाची चव वाढवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढवते. हे पान डेंग्यूच्या उपचारातही गुणकारी आहे. यासाठी पाने पाण्यात उकळून घ्यावी. यानंतर पाणी गाळून प्यावे. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते. हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे.

4) कडुलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने चवीला कडू पण पोषक असतात. त्यांचे नियमित सेवन केल्याने त्वचे संबंधित आजार दूर होतात. यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते. डेंग्यू झाल्यास कडुलिंबाच्या पानांचे पाणी पिल्याने किंवा चघळल्याने प्लेटलेट्स वाढतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT