Home Remedy for Dandruff Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dandruff In Winter: डैंड्रफमुळे सतत डोकं खाजवताय? देवघरात दडलाय रामबाण उपाय

Home Remedy for Dandruff: आज आम्ही तुम्हाला डैंड्रफवर कायमचा तोडगा सुचवणार आहोत, त्यानंतर तुम्हाला काहीही डैंड्रफची समस्या जाणवणार नाही

Akshata Chhatre

How to Reduce Dandruff in Winter

थंडीच्या दिवसांत जर का महिलांना सर्वात जास्ती कोणी त्रास देत असेल तर असतो डैंड्रफ. तुम्हाला देखील थंडीच्या दिवसांमध्ये डैंड्रफचा भयंकर त्रास होतो ना? मग यावर काही उपाय केले की नाही? डैंड्रफ ही अशी गोष्ट आहे जी ना शांत बसू देते ना काम करू देते. अनेकवेळा अंघोळीनंतर आराम नक्कीच मिळतो मात्र हळूहळू डैंड्रफचा त्रास पुन्हा निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला डैंड्रफवर कायमचा तोडगा सुचवणार आहोत, त्यानंतर तुम्हाला काहीही डैंड्रफची समस्या जाणवणार नाही.

थंडीच्या दिवसांमध्ये आपली त्वचा रुक्ष होते, कोरडी पडते आणि म्हणून डैंड्रफ निर्माण होतो. पण याचा उपाय आपल्या देवघरात आहे. हो!! डैंड्रफचा उपाय आपल्या देवघरात लपलेला आहे. कपूर हा डैंड्रफवर भरपूर गुणकारी सिद्ध झाला आहे.

कपूराच्या असलेल्या एंटी-फंगल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे डैंड्रफची समस्या कायमची बंद होऊ शकते, पण हा कपूर नेमका वापरावा तरी कसा?

एक म्हणजे तुम्ही कपूरासोबत नारळाचं तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून डोक्याला लावू शकता. हे तेल जर का आठवड्यातून दोन वेळा न चुकता लावलंत तर नक्कीच फरक दिसून येईल. रिठा हा नेहमीच केसांचा जवळचा मित्र म्हटला गेला आहे. तुम्ही जर का काही दिवस मागे जाऊन पाहिलं तर आपल्या आज्या याच रिठ्याचा वापर करायच्या. तुम्हाला हाच रिठा गरम पाण्यात छान उकळवून घ्यायचा आहे आणि त्यात कपूर टाकून केसांच्या मुळांना लावायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT