Hair Oiling: रात्रभर केसांना तेल लावून झोपताय? मग तुम्हीच आहात केस गळतीचं प्रमुख कारण

Hair Oiling Overnight: हेअर केअरच्या नावाखाली रात्री चपचपीत तेल लावून झोपल्याने खरंच केसांना फायदा होतोय की आपण आणखीन नुकसान करवून घेतोय हे जाणून घेऊया
Hair Oiling Overnight: हेअर केअरच्या नावाखाली रात्री चपचपीत तेल लावून झोपल्याने खरंच केसांना फायदा होतोय की आपण आणखीन नुकसान करवून घेतोय हे जाणून घेऊया
Hair Oiling OvernightDainik Gomantak
Published on
Updated on

Is oiling good for hair?

तुम्ही रोज रात्री झोपताना डोक्याला तेल लावून झोपता का? असं म्हणतात की डोक्याला तेल लावून झोपल्याने केस मऊ होतात किंवा शरीरातील उष्णता कमी होते. अनेक वर्षांपासून आपण या गोष्टी ऐकतोय खरं पण त्यात किती तथ्य आहे हे जाणून घेतलं का? हेअर केअरच्या नावाखाली रात्री चपचपीत तेल लावून झोपल्याने खरंच केसांना फायदा होतोय की आपण आणखीन नुकसान करवून घेतोय हे जाणून घेऊया.

मनावर ताण आला किंवा डोकं दुखत असल्यास आपण डोक्याला भरपूर तेल लावतो. मुली साधरणतः केस धुण्याआधी रात्रभर तेल लावून झोपतात, तेलाची छान चंपी केली जाते. पण तुम्हाला हे माहितीये का तुम्ही हे प्रकार करून तुमच्या केसांना किंवा डोक्याच्या त्वचेला आणखीन त्रास देत आहात?

Hair Oiling Overnight: हेअर केअरच्या नावाखाली रात्री चपचपीत तेल लावून झोपल्याने खरंच केसांना फायदा होतोय की आपण आणखीन नुकसान करवून घेतोय हे जाणून घेऊया
Hair Oiling: केसांना तेल लावताना तुम्हीही याच चुका करता? मग हे वाचाच, अन्यथा...

हो! तेलामुळे नक्कीच केस मऊ आणि शायनिंग बनतात पण म्हणून रात्रभर तेल लावून झोपणं हा उपाय बरोबर नाही. तुम्ही सुद्धा रात्रभर डोक्याला तेल लावून ठेवत असाल तर यामुळे तुम्ही फंगल इन्फेक्शनला आमंत्रण देत आहात शिवाय डँड्रफ देखील वाढवत आहात.

केसांना तेल कधी लावाल?

तुम्ही ज्या दिवशी केस धुणार आहात त्याच दिवशी फक्त एक तास अगोदर केसांना तेल लावा. तेल केसांमध्ये जिरायला ८ तासांच्या अवधीची गरज नसते केवळ १ ते २ तासांत हे काम होऊन जातं, त्यामुळे रात्रभर डोक्याला तेल लावून बसण्याची गरज नाही. केसांना तेल लावत असताना ते हलकं गरम करून घ्या आणि तेल मसाज झाल्यानंतर मोठ्या दातांच्या फणीने केस मोकळे करून घ्या, यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत जाईल आणि हवं ते पोषण मिळायला मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com