Daily Yoga: Naukasana Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily योग: पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करा नौकासन

Daily योग: पोटावर केल्या जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण असलेले नौकासन

दैनिक गोमन्तक

दीर्घायुषी व्हायचं असेल तर दैनंदिन जीवनात योग (Daily Yoga) करणं अत्यंत गरजेचं आहे. यापूर्वी आपण अनेक योग प्रकार पाहिले आहेत. त्यामध्येच आता पोटावर केल्या जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण असलेल्या नौकासन (Naukasana) या आसनाविषयी जाणून घेणार आहोत.

नौकासनाचे फायदे -

१. हे आसन पोटावर झोपून केल्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

२. वजन नियंत्रणात राहते.

३. पाठीचा कणा सरळ राहण्यासाठी मदत मिळते.

४. पाठदुखीच्या समस्या दूर होतात.

५. पचनक्रिया सुरळीत होते.

६. बद्धकोष्ठता, गॅस यासारखे पोटाचे विकार होत नाहीत.

७. किडनीशी निगडीत समस्या दूर होते.

कसे करावे नौकासन?

प्रथम पोटावर झोपावे आणि दोन्ही पाया जुळवून घ्यावेत. यावेळी हात शरीराजवळ ठेवावेत. त्यानंतर हळूहळू श्वास घेत हात व पाय एकाच वेळी हवेत उचलावेत. साधारणपणे 30 अंशांपर्यंत हात व पाय उचलावेत. यावेळी शरीराचा सगळा तोल पोटावर येईल अशा स्थितीत रहावे. काही वेळ याच स्थितीत राहून नंतर हळूहळू पूर्वपदावर यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT