Cucumber Peels Benefits: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

काकडीची साल फेकून देण्याऐवजी अशा प्रकारे करा वापर, आरोग्यासाठी ठरेल वरदान

काकडीचे साल हे आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक

Cucumber Peels Benefits: काकडी सोलून खाऊन त्याची साल डस्टबिनमध्ये फेकणारे अनेक लोक आहेत. पण, काकडीची साल निरुपयोगी नसून त्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात. काकडीची साल साफ केल्यानंतर खाल्ल्याने आरोग्यावर वेगवेगळे फायदे दिसून येतात.

या सालींमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. त्यात आरोग्यासाठी चांगले मॅक्रो न्यूट्रिएंट्स देखील असतात. काकडीचे आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशीर आहे.

काकडीची साल फायबरचा चांगला स्रोत आहे. यामुळे ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते त्यांनी कोकडीचे सालीलह सेवन करावे. यासोबतच त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात.

जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. काकडी व्हिटॅमिन के ने समृद्ध असतात. जे शरीरातील प्रथिने सक्रिय करतात आणि हाडांसाठी चांगले असतात.

  • याप्रकारे करावे सेवन

काकडीची साल खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे काकडीच्या सालेबरोबरच त्या पाण्यात चांगल्या प्रकारे धुवावे. काकडी हलक्या खारट पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे त्यावर चिकटलेले सूक्ष्मजीव देखील नष्ट होतात. 15 ते 20 मिनिटे भिजवल्यानंतर काकडी बाहेर काढा आणि नीट पुसून घ्या. यानंतर काकडी सालासह खा. सालीसोबतच तुम्ही काकडी कापून सँडविच, सॅलड, लोणची किंवा कोणत्याही डिशमध्ये टाकून खाऊ शकता.

  • काकडीचे चिप्स

बटाट्याचे चिप्स चवीला चांगले असले तरी ते आरोग्यासाठी चांगले नसतात. पण काकडीपासुन बनवलेले चिप्स आरोग्यदायी असते. हे चिप्स बनवण्यासाठी काकडीची साले स्वच्छ करून ट्रेमध्ये ठेवा. या सालींना हलके ऑलिव्ह ऑईल लावून ओव्हनमध्ये ठेवा आणि ते कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. हे चिप्स शिजल्यावर चवीनुसार मीठ आणि मसाले टाकून सेवन करु शकता. .

  • त्वचेसाठी फायदेशीर

उन्हाळ्यात काकडीची साले त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी प्रभावी आहेत. काकडी खाल्ल्यानंतर उरलेली काकडी डोळ्यांवर ठेवल्यास उष्णता कमी होते. याशिवाय ही साले बारीक करून गुलाब पाण्यात मिसळून फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावता येते. तसेच चेहऱ्याची चमक वाढेल.

  • काकडीच्या सालीचा सॉस

काकडीची हिरवी चटणी बनवण्यासाठी काकडीची साले, अर्धी वाटी पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, अर्धी काकडी, लिंबू आणि चवीनुसार मीठ घ्या. सर्व साहित्य मिसळा आणि बारीक करा. तुमची काकडीच्या सालीची चटणी तयार आहे. ही हिरवी चटणी तुम्ही तुमच्या चवीनुसार खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT