Covid Alert Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Covid Alert: सावधान! कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक; जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Coronavirus New Strain JN.1: कोरोनाने पुन्हा एकदा दस्तक दिली आहे. कोरोनाच्या नवीन लाटेमुळे जग पुन्हा एकदा भीतीच्या छायेत आहे. हा खतरनाक विषाणू सार्वजनिक जीवन विस्कळीत करतो. गेल्या वेळीही या विषाणूमुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता.

Manish Jadhav

कोरोनाने पुन्हा एकदा दस्तक दिली आहे. कोरोनाच्या नवीन लाटेमुळे जग पुन्हा एकदा भीतीच्या छायेत आहे. हा खतरनाक विषाणू सार्वजनिक जीवन विस्कळीत करतो. गेल्या वेळीही या विषाणूमुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता. लॉकडाऊन, घरुन काम करणे आणि नेहमी घरातच बंदिस्त राहणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक पूर्णपणे नवीन अनुभव होता. लोक अजूनही लॉकडाऊनमधील दिवस विसरलेले नसताना आता त्याच्या नवीन व्हेरिएंटने पुन्हा जगात हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या या व्हेरिएंटला JN.1 व्हर्जन मानले जात आहे. चला तर मग वेळ न दौडता या व्हेरिएंट विषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

JN.1 व्हेरिएंट काय आहे?

कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्ट 2023 मध्ये आढळला होता. तो ओमिक्रॉन फॅमिलीचा एक भाग मानला जातो. ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2.68 पासून बनवला आहे. 2022 मध्ये, या व्हेरिएंटमुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. या व्हेरिएंटमध्ये अधिक उत्परिवर्तन असल्याने हा व्हेरिएंट अधिक धोकादायक मानला जातो. अधिक उत्परिवर्तनांमुळे, तो अधिक संसर्गजन्य बनतो. कोरोनाचा हा व्हेरिएंटही अधिक वेगाने पसरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

JN.1 व्हेरिएंटची लक्षणे

सीडीसी (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) नुसार, या व्हेरिएंटची लक्षणे इतरांपेक्षा वेगळी आहेत की नाही याची पुष्टी झालेली नाही. त्याची सुरुवातीची काही लक्षणे आधी आढळलेल्या व्हेरिएंटच्या रुग्णांसारखीच आहेत.

लक्षणे

नाक सतत वाहते.

कोरडा खोकला.

ताप.

घसा खवखवणे.

डोकेदुखी.

उलट्या आणि मळमळ.

अतिसार.

थंडी जाणवणे.

भारतात किती धोका आहे?

भारतात (India) या विषाणूचा फारसा धोका नाही. भारतातील लोक आधीच ओमिक्रॉन व्हेरिएंटने ग्रस्त आहेत आणि त्याच्या इतर अनेक सब-व्हेरिएंटच्या संपर्कात देखील आले आहेत. त्यामुळे, नवीन विषाणूचा धोका थोडा कमी आहे. पण सर्वांना लस आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहनही केले जात आहे. एका अहवालानुसार, जानेवारी 2024 मध्ये दिल्लीत JN1 चा एक रुग्ण आढळला होता. सध्या केंद्र सरकार देखील कोरोनाबाबत खबरदारी घेत असून त्यावर लक्ष ठेवून आहे.

संरक्षणासाठी काय करावे?

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

मास्क वापरा.

हात सॅनिटायझरने धुवा.

तोंड आणि नाक झाका.

नवीन व्हेरिएंटचा धोका कोणाला जास्त?

कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरिएंटचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांना होत आहे, परंतु हाँगकाँगमध्ये वृद्धांना याचा सर्वाधिक धोका आहे. तिथल्या मृत्यूच्या आकडेवारीत वृद्धांची संख्याही जास्त आहे. याशिवाय, कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक आणि ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांना देखील धोका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT