Cooking Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Tips: रसगुल्ला अन् गुलाबजामुनचा उरलेला पाक फेकुन देताय? असा करा पुन्हा वापर

जर तुम्हीही रसगुल्ला आणि गुलाबजाममधला पाक जास्त झाला म्हणून फेकुन देत असाल तर थांबा. कारण याचा तुम्ही पुन्हा वापर करू शकता.

Puja Bonkile

Cooking Tips: अनेक वेळा घरात सणासुदीला किंवा खास प्रसंगी रसगुल्ला किंवा गुलाब जामुन आणले जातात. तसेच अनेक लोक दुकानांमधुन विकत आणतात. पण अनेक वेळा या पदार्थांमधील पाक शिल्लक राहतो. अशा वेळी आपण तो पाक फेकुन देतो. पण तुम्हाला माहिती आहे का या पाकाचा पुन्हा देखील वापर करता येऊ शकतो. जर तुम्ही उरलेले पाक फेकून देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही साखरेचा पाक वापरून साखरेची बचत करू शकता.

  • चहा

तुम्ही उरलेले पाक रोज घरी चहा बनवण्यासाठी वापरू शकता. यामुळे तुम्ही साखरेऐवजी पाक वापरू शकतो.

  • खीर

खीर बनवतांना उरलेला पाक वापरू शकता. यासाठी तुम्हाला वेगळा पाक तयार करण्याची किंवा साखर वापरण्याची गरज पडणार नाही. तुम्ही चवीनुसार पाक वापरू शकता.

  • ढोकळ्यामध्ये वापरू शकता

दुकानात विकला जाणारा गोड ढोकळा जर तुम्हाला घरीच बनवायचा असेल तर उरलेला पाक वापरू शकता. ढोकळ्यासाठी तुम्हाला दुसरा पाक बनवण्याची गरज भासणार नाही. यासाठी ढोकळा बनवल्यानंतर पाक कोमट करून वरून मिक्स करू शकता.

  • पाक कसा स स्टोअर करावा

पाक जास्त वेळ तसाच ठेवल्याने आंबट चव येऊ शकते. यामुळे जर तुम्हाला साखरेचा पाक जास्त काळ वापरायचा असेल तर तुम्ही स्टोअर करू शकता. पाक चांगला राहावा यासाठी हवाबंद स्वच्छ डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. बाहेर काढताना त्यात पाण्याचा एक थेंबही जाणार नाही याची काळजी घ्यावी.यामुळे पाक चांगला राहिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT