Tecno Spark 10 Pro Moon Explorer : 'चांद्रयान-3'च्या यशानंतर मोबाईल कंपनीने केलं खास सेलिब्रेशन! लाँच केला 'मून एडिशन' स्मार्टफोन

टेक्नो या मोबाईल कंपनीने 'चांद्रयान-3'चे यश अनोख्या पद्धतीने साजरं केलं आहे.
Tecno Spark 10 Pro Moon Explorer
Tecno Spark 10 Pro Moon ExplorerDainik Gomamtak
Published on
Updated on

Tecno Spark 10 Pro Moon Explorer: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर जगभरातून भारत आणि इस्रोचंं कौतुक होत आहे. टेक्नो या मोबाईल कंपनीनेही हे यश अनोख्या पद्धतीने साजरं केलं आहे. या कंपनीने आपल्या Techno Spark 10 Pro मोबाईलचं खास 'मून एक्स्प्लोरर' एडिशन लाँच केलं आहे. हा फोन बजेट फ्रेंडली असून जाणून घेऊया खास फिचर आणि किंमतीबद्दल अधिक माहिती.

वैशिष्ट्य

  • टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोर एडिशन स्मार्टफोनमध्ये ड्युअल-टोन लेदर बॅक फिनिश देण्यात आले आहे.

  • फोनचा मागील भाग हा इको-फ्रेंडली सिलिकॉन बेस्ड लेदरपासून बनविला गेला आहे.

  • काळा आणि पांढरा असे ड्युअल कलर वापरण्यात आला आहे. ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची झलक पाहायला मिळते.

टेक्नोचे म्हणणे आहे की चांद्रयान 3 मोहिमेला यश मिळवून देणार्‍या इस्रोच्या कठोर परिश्रमाला सन्मानित हा फोन लाँच केला आहे.

या फोनच्या डिव्हाइसमध्ये 8 GB रॅम देण्यात आली आहे. जी व्हर्च्युअल रॅम फिचरद्वारे 8 GB पर्यंत वाढवता येते. हँडसेटमध्ये मीडीयाटेक हिलियो G88 प्रोसेसर देखील देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच एलसीडी स्क्रीन देण्यात आली असून त्यावर होल-पंचची सोय आहे.

Tecno Spark 10 Pro Moon Explorer
White Shoes Cleaning Tips: पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

तसेच या फोनमध्ये ड्युअल रिअल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 0.08MP AI लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी रिअल सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असून 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाइस यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे 18W फास्ट चार्जिंग होते.

  • किंमत

टेक्नो स्पार्क 10 प्रो मून एक्सप्लोर एडिशन स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहे. मून एक्सप्लोर एडिशन स्मार्टफोनची विक्री 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टेक्नो स्पार्क 10 प्रो भारतात फक्त ऑफलाइन पार्टनर रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com