Cloth Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cloth Cleaning Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना टाका बर्फाचे तुकडे, मिळेल झटपट रिझल्ट

तुम्हीही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असाल तर ही ट्रिक वापरून पाहा.

Puja Bonkile

Cloth Cleaning Tips: वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचे महिलांचे एक काम सोपे झाले आहे. पण वॉशिंग मशीनमध्ये कपड धुताना काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर कपडे मशीनमधून काढतांना सुरकुत्या पडू नये असे वाटत असेल तर काही ट्रिक्स वापरून तुम्ही ही समस्या कमी करू शकता.

  • वॉशिंग मशीनमध्ये बर्फाचे तुकडे का टाकावे?

अनेक लोक वॉशिंग मशीनचा वापर करतात. तुम्ही जर वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसोबत ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाकले तर कपड्यांना सुरकूत्या पडणार नाहीत. ही ट्रिक वापल्यास तुम्हाला कपड्यांना प्रेस करण्याची गरज पडणार नाही.

कारण जेव्हा वॉशिंग मशीनमध्ये बर्फाचे तुकडे टाकता तेव्हा काही मॅजिक होत नाही तर ड्रायरचे तापमान वाढले की बर्फ वेगाने वितळू लागतो आणि वाफ तयार होऊ लागते. यामुळे कपड्यांवर सुरकुत्या पडत नाहीत.

  • किती बर्फ वापरावा

तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाकु शकता. याचा परिणाम कपड्यांवर सुरकूत्या पडणार नाहीत. यापेक्षा जास्त बर्फाचे तुकडे मशीनमध्ये टाकू नका.

  • या टिप्स फॉलो करा

सर्वात पहिले कपडे थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावे. नंतर वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकावे. नंतर मशीनमध्ये डिटर्जंट टाकावे. कपडे धुतल्यावर, ड्रायरमध्ये 4 ते 5 बर्फाचे तुकडे टाकावे आणि 15 मिनिटे ड्रायर सुरू ठेवावे.नंतर कपडे बाहेर काढल्यावर त्यावर सुरकुत्या दिसणार नाही. यामुळे कपडे प्रेस करण्याची गरज राहणार नाही.

तुमच्याकडे ड्रायर किंवा ड्रायरवाली वॉशिंग मशीन नसल्यास, तसेच प्रेस काम करत नसल्यास, आणखी एका पद्धतीने कपड्यांच्या सुरकुत्या काढू शकता. यासाठी, तुम्हाला व्हिनेगर आणि पाणी एक चमचा या प्रमाणात एकत्र करायचे आहे आणि ते एका स्प्रे बाटलीत भरायचे आहे. यानंतर तूमचे कपडे हँगर्सवर लटकवा आणि ज्या ठिकाणी घडी आहेत त्या ठिकाणी स्प्रे मारा. असे केल्यानंतर जेव्हा कपडे वाळतील तेव्हा त्याजागी कपडे अजिबात दुमडलेले दिसणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT