Relationship Tips to Identify True Love And Crush: प्रेम आणि क्रश अशा दोन भावना आहेत ज्यात एक तर जीवन आनंदाने भरू शकते, तर दुसरे डिप्रेशन दुःख किंवा नैराश्याचे कारण ठरू शकते.
अशा परिस्थितीत प्रेम आणि क्रश यातील फरक योग्य वयात चांगल्या प्रकारे समजून घेतला तर योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी सोयीस्कर होइल.
हे समजून घेण्यासाठीकाही लक्षण जाणून घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा होणारा गोंधळ देखील कमी होईल.
खऱ्या प्रेमाची साइन ...
वुमनहेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा ते वेळोवेळी कमी होत नाही, तर इमोशन अधिक मजबुत होतात.
जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्ण लक्ष देता. इतकंच नाही तर तासनतास त्या व्यक्तीसोबत बोलतांना कंटाळा येत नाही.
जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा तुम्ही प्रत्येक विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी प्रत्येक टॉपिकवर बोलता. तुम्ही एकांतातही त्या व्यक्तीबद्दल, कुटुंबाबद्दल, इत्यादींचा सखोल विचार करू लागता.
जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही एकत्र आयुष्याचे अनेक प्लॅनिंग देखील करता. हे बाँडिंग तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या येते.यामुळे तुम्ही लग्न करण्याचा देखील निर्णय घेता.
तुम्ही दोघं एकमेकांसोबत खूप मोकळे बोलाला सुरूवात करता. तुम्हाला त्यांच्या सर्व समस्या तुमच्या स्वतःच्या वाटतात आणि तुमच्या सर्व समस्या त्यांच्या बनतात. तुम्ही त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू करता.
तुम्हाला रिलेशनशिपमध्ये बॅकअपची गरज वाटत नाही. म्हणून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत डेट करत नाही.
तुम्हाला त्याची तुमच्या कुटुंबाशी ओळख करून देता. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रांमध्येही त्यांच्यासोबत कंफर्टेबल असता.
तुमच्यामध्ये एक पावरफुल लव्ह केमेस्ट्री असते, ज्यामध्ये फिडिकलपेक्षा इमोशनल वेव अधिक असतात. तुमच्यासाठी भावना आणि काळजी सर्वात महत्वाची असते.
तुम्हा दोघांसाठी प्रेम म्हणजे काय ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही नेहमी एकमेकांसोबत राहू शकता.
जर एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्यामध्ये मतभेद असतील तर ते भांडण किंवा नात्यात तुटण्याचे कारण बनत नाही. तुम्ही एकमेकांचे डिस-एग्रीमेंट सहज स्वीकारता. हे सर्व असूनही तुम्ही इमोशन होता.
फक्त आकर्षण आहे हे कसे ओळखाल?
एखाद्या व्यक्तीबद्दल असलेले आकर्षण हे जास्त वेळ राहत नाही.
केवळ आकर्षण असलेल्या व्यक्ती सीक्रेट शेअर करत नाही.
आकर्षण असलेल्या व्यक्तीमध्ये केवळ शारिरिक आकर्षण असते.
एखाद्याला पाहून फक्त आकर्षण होत असेल तर ते खरं प्रेम नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.