Dirty Cleaning Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: प्लास्टिकची खुर्ची खराब झाल्यास असे करा स्वच्छ

घरातील प्लास्टिकची खुर्ची खराब झाल्यास फेकून न देता तुम्ही या सिंपल ट्रिक्स वापरून स्वच्छ करू शकता.

Puja Bonkile

Dirty Chair Cleaning Cleaning Tips: प्रत्येकाकडे प्लास्टिकच्या खुर्च्या असतात. कारण त्या स्वस्त आणि टिकाऊ असतात. तसेच या खुर्च्या वजनाने हलक्या असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. हेच कारण आहे की जवळजवळ सर्वच घरांमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या असतात.

पण प्लास्टिकची खुर्ची स्वच्छ न ठेवल्यास लवकर खराब होते. तसेच खुर्ची काळी पडू लागते. यामुळे तुम्हाला जर खुर्ची वर्षानुवर्ष नवीन दिसावी असे वाटत असेल तर तुम्ही पुढे सांगितलेल्या गोष्टी घरी नक्की ट्राय करू शकता.

  • डिटर्जंट आणि व्हिनेगर

खुर्चीवरचे काळे डाग काढण्यासाठी स्क्रबरचा वापर करू नका. कारण असे केल्याने डाग कमी होणार नाही. याउलट खुर्चींवर रेषा-रेषा दिसून जास्त खराब दिसेल. यामुळे कोणतेही कपडे धुण्याची पावडर आणि व्हिनेगर मिक्स करून हे मिश्रण खुर्चीवर टाकावे. नंतर सॉफ्ट स्पंजने स्वच्छ करावे.

  • शॅम्पुचे पाणी

शॅम्पुचा वापर करून तुम्ही खराब खुर्ची नव्यासारखी चमकवु शकता. यासाठी प्रत्येक वेळी शॅम्पु आणण्याची गरज नाही. तुम्ही एक्सपायर झालेले शॅम्पु खुर्ची स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.

  • बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून तुम्ही प्लास्टिकची खर्ची स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्यावे आणि त्यात 1/2 चमचे सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करावा. नंतर सॉफ्ट स्पंजने खुर्ची स्वच्छ पुसावी. प्लास्टिकची खुर्ची नव्यासारखी चमकु लागेल.

  • या गोष्टी ठेवाव्या लक्षात

प्लास्टिकची खुर्ची वर्षानुवर्ष नवीन दिसण्यासाठी स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. खुर्ची जास्त वेळ सुर्यप्रकाशात ठेऊ नका. तसेच महिन्यातून किमान १ ते २ वेळा पाण्याने स्वच्छ धुवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT