Cleaning Tips: अनेक लोकांना त्यांचे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आवडते. काही लोक दिवसातून दोनदा तर काही लोक दिवसातून एकदा स्वयंपाकघर स्वच्छ करतात. असे काही लोक आहेत, जे आठवड्यातून एकदाच स्वयंपाकघर स्वच्छ करतात.
पण लोक स्वयंपाकघर स्वच्छ करतात, पण त्यात ठेवलेल्या वस्तूंच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला विसरतात. किचनमध्ये काही गोष्टी स्वच्छ दिसत असतील, पण त्यामध्ये इतके बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया स्वयंपाकघरातील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरातील या गोष्टीही स्वच्छ ठेवाव्या
फ्रिज
स्वयंपाकघरात असलेल्या फ्रीजची साफसफाई देखील करणे गरजेचे आहे. कारण फळे आणि भाज्यांपासून ते अन्नपदार्थांपर्यंत सर्व काही फ्रीजमध्ये साठवले जाते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फ्रीज स्वच्छ करावे.
डस्टबिन
तुम्ही स्वयंपाकघरातील कचरा वेळोवेळी ज्या डस्टबिनमध्ये टाकता ते स्वच्छ करावे. कारण डस्टबिनमध्ये अनेक धोकादायक बॅक्टेरिया आढळतात. ज्यामुळे घरातील लोक आजारी पडू शकतात.
सिंक
स्वयंपाकघरातील सिंक देखील दिवसातून दोनदा धुवावे. एकदा सकाळी आणि एकदा रात्री धुवावे. भांडी धुण्यापूर्वी सिंक धुवावे.
दरवाजाचे हँडल आणि इलेक्ट्रिक स्विच
किचनच्या दरवाजाच्या हँडल्स आणि इलेक्ट्रिक स्विचेसमधूनही बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे फार लोकांना माहीत नाही. म्हणूनच जेव्हाही तुम्ही स्वयंपाकघर स्वच्छ कराल तेव्हा या दोन गोष्टी स्वच्छ करायला विसरू नका.
डिशक्लोथ
ओली भांडी पुसण्यासाठी आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरता ते कापड देखील स्वच्छ करायला हवे. अनेक लोक ते कापड स्वच्छ करत नाही. स्वयंपाकघरातील कापड दररोज किंवा एक दिवसानंतर धुवावे.
स्पंज
तुम्ही भांडी धुण्यासाठी जो स्पंज वापरता, तो स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे. बर्याच लोकांना असे वाटते की भांडी धुताना साबण लावला तर ते स्वच्छ होते. पण तसे नाही. घाणेरडी भांडी धुतल्यानंतर स्पंज घाण होतो. यामुळे स्पंज धुणे गरजेचे आहे.
चॉपिंग बोर्ड
तुम्ही भाजी कापण्यासाठी जो चॉपिंग बोर्ड वापरता, तो चॉपिंग बोर्ड देखील स्वच्छ करत राहणे आवश्यक आहे. लाकडी चॉपिंग बोर्डवर मोठ्या प्रमाणात जीवाणू असू शकतात. यामुळेच स्वयंपाकघर साफ करताना चॉपिंग बोर्ड बॅक्टेरियामुक्त करायला विसरू नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.