Lemongrass Tea Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cholesterol Controlling : कोलेस्टेरॉलवर रामबाण उपाय म्हणजे हा चहा; बनवायचा कसा हे घ्या जाणून

उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब या दोन्ही सध्याच्या काळातील प्रमुख आरोग्याच्या समस्या बनल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Lemongrass Tea Benefits : उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब या दोन्ही सध्याच्या काळातील प्रमुख आरोग्याच्या समस्या बनल्या आहेत. आपली स्वतःची जीवनशैली आणि रोजच्या खाण्याच्या सवयी याला कारणीभूत आहेत. भारतातील अनेकांना तेलकट आणि जंक फूड खाणे आवडते, त्यामुळे आपल्या नसांमध्ये प्लेक जमा होऊ लागतात.

अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका, मधुमेह, कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट फेल्युअर आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी आपण काय करू शकतो ते जाणून घेऊया.

या चहामुळे कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी होईल

कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब (हाय बीपी) टाळण्यासाठी आपल्याला लेमनग्रासपासून बनवलेला हर्बल चहा प्यावा लागतो. याचा आपल्या आरोग्याला सकारात्मक फायदा होतो.

लेमनग्रासमध्ये पोषक घटक आढळतात

लेमनग्रास ही अतिशय सुगंधी आणि पौष्टिक वनस्पती आहे, त्यात पोषक तत्वांची कमतरता नाही. यामध्ये व्हिटॅमिन ए, कॉपर, झिंक, फॉलिक अॅसिड, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.

या रोगांवर प्रभावकारी

लेमनग्रासच्या मदतीने कोलेस्ट्रॉल, बीपी, किडनीचे आजार, नैराश्य, झोप न लागणे, लठ्ठपणा, दमा आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणूनच यापासून बनवलेला हर्बल चहा तुम्ही रोज प्या, काही दिवसातच फरक दिसून येईल.

लेमनग्रास चहा कसा तयार करायचा?

लेमनग्रास चहा तयार करण्यासाठी, सर्वप्रथम एक चमचा बारीक चिरलेला लेमनग्रास घ्या आणि एक कप पाण्यात मिसळा आणि 10 मिनिटे उकळवा. चव वाढवण्यासाठी तुम्ही आले मिक्सही करू शकता. हा चहा दिवसातून एकदा किंवा दोनदा पिऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT