Goa Pride Festival 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोव्यात प्रथमच ‘गोवा प्राईड फेस्टीव्हल’ चे आयोजन

Goa Pride Festival 2022: 1969 वर्षी झालेल्या मॅनहॅटनमधल्या ‘स्टोनवॉल उठावा’ च्या स्मृतीप्रित्यर्थ हा महिना साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

लेस्बीयन, गे, बायसेक्‍शुअल, ट्रांसजेंडर यांच्या समुदायामार्फत दरवर्षी जून महिना ‘प्राईड मंथ’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1969 वर्षी झालेल्या मॅनहॅटनमधल्या ‘स्टोनवॉल उठावा’ च्या स्मृतीप्रित्यर्थ हा महिना साजरा केला जातो. ‘स्टोनवॉल उठाव’ हा युनायटेड स्टेटसमधील ‘गे’ लिबरेशन चळवळीचा महत्त्वाचा भाग होता. (Goa Pride Festival 2022 news)

‘एलजीबीटीक्यू प्राईड मंथ’ साजरा करण्याचा भाग म्हणून गोव्यात (Goa) प्रथमच ‘गोवा प्राईड फेस्टीव्हल’ (Goa Pride Festival) चे आयोजन करण्यात आले आहे. 24 जून ते 27 जूनपर्यंत हा महोत्सव हणजूणे येथील ‘मुस्टाचे गोवा लक्झारिया’ मध्ये साजरा करण्यात येईल.

‘एलजीबीटी’ (LGBT) साठी विशेष काम करणाऱ्या ‘मुस्टाचे एस्कॅप’ या हॉस्टेल साखळी चालवणाऱ्या आस्थापनाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. विविध कार्यक्रमांचा समावेश असणारा हा महोत्सव विविधरंगी स्वरुपाचा असणार आहे. ‘मुस्टाचे’ चा व्यवस्थापक असणारा 21 वर्षीय प्रणय भौमिक हा या महोत्सवाबद्दल माहिती देताना म्हणाला की, ‘प्रेम आणि एकात्मता या भावना या महोत्सवाद्वारे आम्ही साजऱ्या करत आहोत. अनेक लोक आहेत ज्यांना ‘ड्रेस अप’ करणे आवडते. त्यामुळे या महोत्सवात ‘फॅशन शो’ (Fashion Show) हा महत्त्वाचा कार्यक्रम असेलच. ज्या लोकांना बोलायला आवडते त्यांच्यासाठी ‘ओपन माईक’ (Open Mike) हा कार्यक्रम असेल’

लोकांना स्वतःचा शोध घेण्यात आणि स्वत:ला जाणून घेण्यात मदत व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे. ‘ते कोणत्या समुदायाचे भाग आहेत आणि त्यांची प्राथमिकता काय आहे याविषयी इथे कुणालाही प्रश्‍न विचारले जाणार नाहीत. लोक इथे येऊन स्वतःच्या मनाला रिझवतील. तिथे कुठलाही भेदभाव असणार नाही’ असेही प्रणय पुढे म्हणाला. या तीन दिवसांच्या ‘गोवा प्राईड फेस्टीवल’ चा कोणीही मुक्तपणे भाग होऊ शकतो. ‘चाय पे चर्चा’ सारखा अनौपचारिक कार्यक्रमही या महोत्सवाचा भाग राहील.

पहिला दिवस: (ड्रॅग देम डाऊन)

'फ्लॅश मॉब’ आणि ‘संगीत’ याच्या साथीने पहिल्या दिवशी ‘गोवा प्राईड फेस्टीव्हलचे उद्‍घाटन होईल. ‘जेंडर ब्लेंडर’ फॅशन शो, ड्रॅग शो, पेटींग पार्टी, ट्रेजर हंट चे पहिल्या दिवशीचे कार्यक्रम असतील. प्रख्यात फॅशन डिझायनर आणि फॅशन स्टाईलिस्ट हरेकृष्ण सिद्‍धांत आणि पर्यावरणपूरक वस्त्ररचनाकार कृष्णराजसिंह चुडासामा हे पहिल्या दिवसाच्या फॅशन शो चे भाग असतील.

दुसरा दिवस: (क्विअर ऑन द ब्लॉक)

दुसऱ्या दिवशी ड्रॅग शो तर असेलच पण संध्याकाळ फायर शो, जादूचे खेळ अशा कार्यक्रमांनी रंगेल. ‘माय ब्रदर निखिल’ या सिनेमाचे प्रदर्शनही दुसऱ्या दिवशी होईल. हलक्या फुलक्या विषयावरील चर्चेचा अंतर्भाव असलेला ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रमही दुसऱ्या दिवसाचा भाग असेल.

तिसरा दिवस: (लेट्स गेट वॅट)

‘सनडाऊनर पूल पार्टी’ ही तिसऱ्या दिवसाची विशेषता राहील. या महोत्सवाचा भाग म्हणून या दिवशी गोव्याच्या विविध भागात ‘फ्लॅश मॉब’चे सादरीकरणही केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT