bones Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Causes Of Bone Weakness: हाडे कमकुवत होण्यासाठी तुमच्या या '3' सवयी जबाबदार

Causes Of Bone Weakness: त्या कुटुंबातील लोकांना हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

Causes Of Bone Weakness: शरीराच्या तंदुरुस्तीसाठी हाडे मजबूत असणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चुकीची जीवनशैली आणि चौरस आहाराच्या कमतरतेमुळे आजकाल लोकांची हाडे वेळेपूर्वी कमकुवत होत आहेत.

त्यामुळे त्यांना हाडांचे दुखणे आणि चालण्यात अडचणी वेळेपूर्वी येत आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या 3 सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे तुम्हीही हाडांशी संबंधित समस्यांना बळी पडू शकता.

1. शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे

हाडांच्या बळकटीसाठी शरीराला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असतो. त्यातून आपल्या शरीराला ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. पण घाम येण्याच्या, त्वचा टॅन होण्याच्या किंवा उन्हाच्या भीतीने लोक उन्हात बाहेर पडणे टाळतात. त्याची ही सवय त्याला हाडांच्या दुखण्याला बळी पडत आहे. मात्र यावर उपाय म्हणून तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाश अंगावर घेऊ शकता.

2. पौष्टिक आहाराची कमतरता

हाडे तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी मिळणे खूप गरजेचे आहे. कॅल्शियमसाठी आपण दररोज दूध प्यावे, तसेच कॅल्शियम शोषून घेणारे जंक फूड खाणे टाळावे. ज्या घरांमध्ये चौरस आहाराची कमतरता असते, त्या कुटुंबातील लोकांना हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

3. शारीरिक हालचालींचा अभाव

तुमच्या शरीरातील हाडे योग्यरित्या कार्यरत राहण्यासाठी, तुम्ही नियमितपणे शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. असे केल्याने हाडांमध्ये लवचिकता राहते आणि ते व्यवस्थित कार्य करतात. त्यामुळे शारीरिक हालचालीपासून दूर राहणाऱ्यांची हाडे लवकर कमकुवत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT