Heart attack - Symptoms & causes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cardiac Arrest : पायांच्या नसा देतात महत्त्वाचे संकेत! कार्डिॲक अरेस्टच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Cardiac Arrest Reasons: आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेला ताण आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे कार्डिॲक अरेस्टच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Cardiac Arrest Symptoms: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नाईक यांनी बुधवारी (15 ऑक्टोबर) वयाच्या 79 वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डिॲक संबंधी समस्या जाणवल्याने त्यांचा हा मृत्यू झाला.

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेला ताण आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे कार्डिॲक अरेस्टच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कार्डिॲक अरेस्टमध्ये (Cardiac Arrest) हृदयाचे पंपिंग अचानक थांबते आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास थेट मृत्यू ओढवतो. अनेकदा लोक याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि तोच निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेततो. चला तर मग कार्डिॲक अरेस्टची लक्षणे, कारणे आणि बचावात्मक उपायांबाबत जाणून घेऊया...

प्रसिद्ध डॉ. पंकज कुमार जैन सांगतात, कार्डिॲक अरेस्टची अचूक ओळख आणि वेळेवर उपचार घेतल्यास एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यातील फरक

पण अनेकदा लोक हार्ट अटॅक (Heart Attack) आणि कार्डिॲक अरेस्ट यांना एकच मानतात, पण या दोन्ही वेगवेगळ्या वैद्यकीय परिस्थिती आहेत.

  • हार्ट अटॅक: हा तेव्हा येतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी (Thrombosis) तयार झाल्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो.

  • कार्डिॲक अरेस्ट: यामध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबतात आणि शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) पूर्णपणे थांबते. हार्ट अटॅक कधीकधी कार्डिॲक अरेस्टचे कारण बनू शकतो, पण प्रत्येक हार्ट अटॅकमुळे कार्डिॲक अरेस्ट होतोच असे नाही.

पायांच्या नसा देतात महत्त्वाचे संकेत

डॉ. जैन यांच्या मते, शरीराचा एक असा भाग आहे, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात आणि तो म्हणजे पायांच्या नसा. जर पायांना अचानक सूज आली, लालसरपणा किंवा गरमपणा जाणवत असेल, तर ते डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT) चे संकेत असू शकतात.

डीव्हीटीमध्ये नसांमध्ये रक्ताची गुठळी (Thrombus) तयार होते. ही गुठळी रक्ताच्या प्रवाहाबरोबर हृदयापर्यंत पोहोचू शकते आणि तिथे मोठा अडथळा निर्माण करुन कार्डिॲक अरेस्ट आणू शकते. इतकेच नाही जर ही गुठळी मेंदूपर्यंत पोहोचली तर लकवा (Paralysis) होण्याचाही धोका असतो. त्यामुळे पायांमध्ये होणारे बदल गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

कार्डिॲक अरेस्टची प्रमुख कारणे

कार्डिॲक अरेस्ट होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

  • हृदयाचे ठोके अनियमित होणे.

  • हृदयाच्या झडपांमध्ये (Heart Valve) बिघाड.

  • अचानक आलेला मोठा भावनिक धक्का किंवा ताण.

  • आधीपासून असलेले हृदयाचे विकार.

  • उच्च रक्तदाब (High BP) आणि मधुमेह (Diabetes).

कार्डिॲक अरेस्ट कसा ओळखावा?

कार्डिॲक अरेस्टची लक्षणे अचानक आणि तीव्र असतात.

  • कोणत्याही कारणशिवाय अचानक बेशुद्ध पडणे.

  • उभे असताना किंवा चालताना जागेवर कोसळणे.

  • छातीत अचानक तीव्र अस्वस्थता जाणवणे.

  • श्वास पूर्णपणे थांबणे किंवा हृदयाचे ठोके खूप जलद जाणवणे.

प्रतिबंधात्मक उपाय

कार्डिॲक अरेस्ट आल्यास रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ सीपीआर (CPR - Cardio Pulmonary Resuscitation) देणे अत्यंत गरजेचे असते. सीपीआरमध्ये एका व्यक्तीने छातीवर विशिष्ट पद्धतीने पंपिंग करणे आणि दुसऱ्या व्यक्तीने तोंडाद्वारे ऑक्सिजन देणे समाविष्ट असते. त्याचबरोबर, लगेच ॲम्बुलन्स (108) बोलावणे गरजेचे आहे. वेळेत दिलेला सीपीआर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी निर्णायक ठरतो.

कोणाला अधिक धोका?

  • वृद्ध व्यक्ती.

  • मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण.

  • ज्यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आलेला आहे.

पायांच्या नसांवर दिसणाऱ्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करु नका. ते तुमच्या हृदयाच्या आरोग्याचे संकेत असू शकतात. कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण तुमची सतर्कता आणि वेळेवर उपचार तुमचा जीव वाचवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT