Car Headrest Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Care Tips: प्रवास सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, वाचा एका क्लिकवर

जर तुम्ही तुमच्या कारने दररोज प्रवास करत असाल तर त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Car Care Tips: देशात दररोज मोठ्या संख्येने लोक कारने प्रवास करतात. काही लोक घरातून ऑफिसला जातात तर काही लोक प्रवासासाठी कारचा वापर करतात. तुम्ही जेव्हाही कार प्रवास करता तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे हे जाणून घेऊया.

टायर तपासा


गाडी चालवण्यापूर्वी त्याचे टायर तपासणे फार महत्वाचे आहे. गाडीच्या टायरमध्ये काही अडचण आल्यास गाडी चालवणे खूप कठीण होऊन बसते. म्हणून जेव्हाही तुम्ही कारने प्रवास सुरू करता तेव्हा गाडीचे टायर तपासावे. टायर्समध्ये हवा कमी असल्यास त्यात हवा भरून घ्या. पंक्चर असल्यास कार चालविण्यापूर्वी पंक्चर दुरुस्त करा किंवा टायर बदलावे.

लाईट तपासा


कार चालवण्यापूर्वी कारचे सर्व दिवे तपासणे देखील शहाणपणाचे आहे. गाडी चालवताना इंडिकेटर, ब्रेक लाईट इत्यादींचा वापर केला जातो तर रात्रीच्या वेळी गाडीचे हेड आणि टेल लाईट्स व्यवस्थित काम करणं खूप गरजेचं आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास अपघाताचा धोका वाढतो आणि अनेक वेळा पोलिस दंड लावू शकतात.

इंजिन ऑईल तपासणे

गाडी चालवण्यापूर्वी इंजिन ऑइल तपासणे अत्यंत आवश्यक आहे. गाडीतील इंजिन ऑइल कमी होऊन गाडी चालवली तर इंजिन खराब होण्याचा धोका वाढतो. शिवाय, ते दुरुस्त करण्यासाठी तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा इंजिन ऑइल तपासणे चांगले.

कूलंट चेक करावे

कारमधील कूलंटचे प्रमाण तपासण्यासोबतच टायर आणि इंजिन ऑइल तपासणे महत्त्वाचे आहे. कारमध्ये कूलंट लीक झाल्यास त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते किंवा पूर्णपणे अदृश्य होते. बर्‍याचदा लोक निष्काळजीपणामुळे ते तपासत नाहीत आणि परिणामी कार जास्त गरम होऊ लागते. ज्यामुळे इंजिनचेही मोठे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT