Weight loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Brown Rice: वजन कमी करण्यासाठी 'हा' भात ठरेल उपयुक्त

Brown Rice: याबरोबरच कॅल्शिअममुळे तुमचे दातदेखील मजबूत होतात.

दैनिक गोमन्तक

Brown Rice: आपल्यापैकी अनेकांना रोजच्या जेवणात भात नसेल तर पोट भरल्यासारखे वाटत नाही. आपल्याला अनेकदा हे सांगितले जाते भात खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे अनेकजण भात खाणेदेखील बंद करतात. मात्र तुम्हाला हे माहीती आहे का?

पांढऱ्या भाताऐवजी आपण लाल तांदळाचा भात खाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे लाल तांदळाचा भात आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असतो. चला तर जाणून घेऊयात लाल तांदळाच्या भाताचा आपल्या शरीराला काय फायदे होतात.

१. कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर

लाल तांदळामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे लाल तांदळाचा भात खाण्यास सुरुवात केली किंवा आहारात समावेश केला तर तुमच्या शरीरातील कॅल्शिअमची कमतरता नाहीशी होईल. याबरोबरच कॅल्शिअममुळे तुमचे दातदेखील मजबूत होतात.

२. वजन कमी होते

जर तुम्हाला भात खाऊन वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पांढऱ्या तांदळाच्या भाताऐवजी लालतांदळाचा भात खाल्ला पाहिजे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटकही शरीराला मिळतात आणि तुमचे वजनही कमी होते.

३. मधुमेहांच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाल तांदळाचा भात अत्यंत उपयुक्त मानला जातो. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत करते. लाल तांदळाच्या भातामुळे तुमची प्रकृती उत्तम राहते.

४. अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त

सेलेनियम, विटामिन सी आणि बीटा-कॅरोटीन हे महत्वाचे अँटीऑक्सिडंट लाल तांदळामध्ये आढळतात. त्यामुळे हा भात ज्याला ब्राऊन राइस असेदेखील म्हटले जाते तो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

५. कोलेस्ट्रोल होते कमी

ज्यांना कोलेस्ट्रोलच्या समस्येने ग्रासलेले असते, त्यांच्यासाठीदेखील लाल तांदळाचा भात उपयुक्त मानला जातो. यामध्ये मोनाकोलिन या घटकाचे प्रमाण आढळत असल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच तुमचे हृदयाचे आरोग्यदेखील उत्तम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT