Women care Tips| Bra Syndrome  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bra Strap Syndrome: तुम्हीही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? होऊ शकतो हा गंभीर आजार....महिलांनो वेळीच व्हा सावध

बहुतेक महिलांना हे देखील कळत नाही की ब्रेसियरचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

Puja Bonkile

Bra Syndrome: महिलांना अनेक वेळा हात, मान आणि खांदे दुखीची समस्या जाणवते. त्यामागचे कारण 'ब्रेसियर' असू शकते. होय, अनेक महिलांना हे देखील कळत नाही की त्यांनी घातलेल्या 'ब्रेसियर' चा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तुम्हाला हे वाचून विचित्र वाटत असेल, पण प्रत्यक्षात 'ब्रेसियर' चे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. 

'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' याला वैद्यकीय भाषेत कॉस्टोक्लाव्हिक्युलर सिंड्रोम असेही म्हणतात. जड स्तन असलेल्या स्त्रिया जेव्हा पातळ स्ट्रिप 'ब्रेसियर' घालतात तेव्हा त्यांच्या स्तनांचा सर्व भार ब्रेसियर वर येतो.  यामुळे ब्रेसियरच्या पट्ट्या खांद्यावरून खेचू लागतात आणि त्यांच्यावर जास्त दबाव येतो. यामुळे तुमचे खांदे दुखू लागतात. ही समस्या सामान्यतः पातळ पट्ट्याची ब्रेसियर घातल्याने होते.  

  • दैनंदिन कामे करताना होते त्रास

ब्रेसियरच्या पट्ट्यांमुळे खांद्यावर दबाव येतो आणि मान, खांदा, पाठ आणि हात दुखू लागतात. ब्रामुळे होणारी अस्वस्थता बहुतेक लठ्ठ, जड स्तन असलेल्या महिलांमध्ये दिसून येते. 'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' ग्रस्त महिलांना अनेकदा मान आणि खांदे दुखीला सामोरे जावे लागते. कधी-कधी या दुखण्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करण्यातही खूप अडचणी येतात. 

  • वेदनापासून मुक्त कसे व्हावे?

ब्रेसियरमुळे होणा-या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कधीही टाइट ब्रेसियर घालू नका. तसेच कपचा आकार नेहमीच लक्षाच ठेवी आणि पातळ पट्टा असलेली ब्रेसियर रोज घालणे टाळावे.

रात्री झोपण्यापुर्वी नेहमी आपली ब्रेसियर काढून मोकळे झोपावे.

जेव्हा घरी असता तेव्हा ब्रेसियर घालणे टाळावे.

ब्रेसियर घालण्यासाठी तुम्ही शोल्डर पॅड वापरू शकता. यामुळे खाद्यांवर पट्ट्यामुळे होणारे लाल जाग कमी होतील.

पाठदुखी टाळण्यासाठी क्रॉस पट्टी असलेली ब्रेसियर घालावी.

ब्रेसियरच्या कपच्या आखाराची विशेष खाळजी घ्यावी.

चुकीच्या साइजची ब्रेसियर घातल्यास वेगना होऊ शकतात.

अंडर वायर ब्रेसियर घातल्याने मज्जातंतूसाठी घातक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT