Body Warming Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Body Warming Tips: कडाक्याच्या थंडीत 'या' गोष्टी शरीराला आतून ठेवतील उबदार

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पुढील दोन औषधी वनस्पतींचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Winter Care Tips: हिवाळ्याला सुरूवात झाली असून अनेक आजार डोकंवर काढतात. या दिवसांमध्ये शरीराला निरोगी आणि उबदार ठेवण्यासाठी अनेक उपाय करतात. कारण हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. यामुळे सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्ग यासारखे अनेक आजार उद्भवू शकतात. काही लोकांना उबदार कपडे घालून देखील या दिवसांमध्ये जास्त थंडी जाणवते.

हिवाळ्यात थंडी वाढली की थंडीमुळे हात पाय सुन्न होऊ शकतात. कधी कधी थंडीमुळे हातपाय दुखू लागतात. किचनमध्ये असलेले काही मसाले हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी खूप मदत करतात. काही मसाल्यांचा गुणधर्म हा नैसर्गिकरित्या गरम असतो आणि शरीराला उबदार ठेवण्यासाठी प्रभावी असतात. चला तर मग जाणून घेऊया प्रचंड थंडीतही स्वतःला उबदार कसे ठेवायचे.

  • दालचिनीचा आहार समावेश करावा

दालचिनी ही एक औषधी वनस्पती आहे. जी शरीराला उबदार ठेवण्यासाठी मदत करते. दालचिनी आणि आलं हे दोन्ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध मसाले आहेत. जे शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. हिवाळ्यात हा मसाला शरीराला उबदार कसा ठेवतो आणि त्याचे सेवन कसे करावे हे जाणून घेऊया.

  • दालचिनीचा चहा

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात दालचिनीचा एक गरम मसाला म्हणून वापर केला जातो. ज्याचा तापमानवाढीचा प्रभाव असतो. हिवाळ्यात हा मसाला टाकून चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार बरे होतात. दालचिनीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. दालचिनीचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी चहामध्ये दालचिनीचे सेवन करावे.

  • दालचिनीचा चहा कसा बनवायचा

दालचिनीचा चहा बनवण्यासाठी सर्वात पहिले एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालावे. नंतर त्यात दालचिनीचा तुकडा घालावा. पाणी निम्मे होईपर्यंत दोन्ही गोष्टी चांगले उकळू द्यावे. पाण्याचा रंग दालचिनीसारखा दिसू लागल्यावर गॅसवरून पाणी काढून गरमागरम सेवन करावे.

  • हळदीचा चहा

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचा चहाचे सेवन करावे. हळद ही एक उत्कृष्ट औषधी वनस्पती आहे. तसेच हळदीचा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे हिवाळ्यात शरीराला उबदार आणि निरोगी ठेवते. दुधासोबत हळदीचेही सेवन करू शकता.

  • हळदीचा चहा कसा बनवायचा

हळदीचा चहा पाणी, हळद, दालचिनी, आलं, लिंबाचा रस आणि मध वापरून बनवला जातो. हळदीचा चहा बनवण्यासाठी सर्वात पहिले एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद, दालचिनीचा तुकडा आणि थोडे आलं घालून उकळावे. पाणी अर्धवट राहिल्यावर गॅस बंद करावे. हे पाणी तुम्ही मध आणि लिंबू घालूनही पिऊ शकता. हळदीचा चहा शरीराला उबदार ठेवतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT