जुन्या साड्या फेकून देण्यापुर्वी 'ही' बातमी वाचाच Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जुन्या साड्या फेकून देण्यापुर्वी 'ही' बातमी वाचाच

तुमच्याकडे जर जुनी सिल्क (Silk) किंवा बनारसी साडी (Banarasi saree) असेल तर तुम्ही त्यापासूनसुंदर सूट किंवा कुर्ता बनवू शकता

दैनिक गोमन्तक

साडी (saree) हा असा प्रकार आहे, ज्याला आपण हवे तसे परिधान करू शकतो. आईच्या कपाटात कधी एक नजर जरी फिरवली तरी आपल्याला अनेक प्रकारच्या साड्या (saree) दिसतात. यात अनेकवेळा वापरलेली पण सुस्थितीत असलेल्या अनेक साड्याही आईच्या कपाटात तुम्हाला पाहायला मिळतील. या साड्या वापरात नसल्याने आई त्या टाकू देण्याच्या किंवा एखाद्या गरीब बाईला देण्याच्या विचारात असते. पण जर तुम्हीच यातील एखादी साडी घेऊन तिचा पुर्नवापर करु शकता. पण तो कसा, जुन्या साड्यांचा वापर कसा कारायचा यासाठी एकदा ही बातमी वाचा.

जुन्या साड्यांपासून तुम्ही अनारकली सूट ते लेहंगापर्यंत ड्रेसपर्यंत अनेक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. याचे दोन फायदे आहेत की तुमची आई जुन्या साड्या वापरण्यास नकार देणार नाही आणि दुसरे म्हणजे तुम्हाला आकर्षक असे ड्रेस बनवायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊया जुन्या साड्यांचा कसा करावा वापर.

* सूट किंवा कुर्ता (Suit or kurta)

तुमच्याकडे जर सिल्क किंवा बनारसी साडी असेल तर तुम्ही त्यापासून मस्त सूट किंवा कुर्ता बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त सिल्कची साडी किंवा बनारसी साडी आपल्या फिटीगनुसार शिवून घ्यावे लागेल. त्याला जुळणारा प्लाजो किंवा मिळता-जुळता सलवार खरेदी केल्यास तुमचा पार्टीसाठी नवीन ड्रेस (New Dress) तयार आहे.

* लेहंगा (Lehenga)

आजकाल लेहंगा (Lehenga) खूप ट्रेंडमध्ये आहे. तुमच्याकडे प्रिंटेड किंवा डिझाईन असणारी जुनी साडी असल्यास तुम्ही सुंदर लेहंगा तयार करू शकता. लेहंगा तयार करण्यासाठी सर्वप्रथम साडी लांब असावी याची खात्री करून घ्यावी. कारण साडीची लांबी कमी असल्यास घेरदार लहंगा तयार होणार नाही.

* स्कार्फ किंवा शरारा (Scarf or sharara)

जर तुमच्याकडे जुनी जॉर्जत किंवा शिफॅानची साडी असेल तर, तुम्ही त्यातून एक सुंदर शरारा किंवा स्कार्फ तयार करू शकता. जे तुम्ही तुमच्या ऑफ व्हाइट किंवा इतर कुर्तींशी कॉन्ट्रास्टमध्ये (Contrast) परिधान करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही हे तुमच्या जीन्ससोबतसुद्धा मॅच (Match) करून परिधान करू शकता.

* पडदा (Curtains)

तुमच्याकडे जुन्या नेटच्या साड्या (Old net sarees) असतील तर तुम्ही त्याच्यापासून घराच्या दारासाठी पडदे बनवू शकता. जर नेटची जुनी साडी लांब असेल तर तुम्ही आरामात दारं आणि खिडक्यांसाठी पडदे तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या घरातील दाराची लांबी मोजावी आणि त्यानुसार साडी कापावी, नंतर खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यावी. तुमच्या जुन्या साडीपासून आकर्षक असे नवे पडदे (Curtains) तयार होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT