Fashion : आपण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे कपडे घालत असतो. मुली आणि मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस असतात. परंतु कपड्यांच्या बाबतीत अशी एक गोष्ट आहे की जवळजवळ प्रत्येकांची कपडे वापरण्याची पद्धत एकच आहे. असे सहसा जीन्सच्याबाबत (Jeans) होते. लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत जीन्स (Jeans) सर्वच वापरतात. आजच्या युगात खास म्हणजे तरुण पिढीत जीन्स वापरण्याची खूप क्रेज आहे. तसेच ते ही क्रेज (Craze) महाग देखील असते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे कपडे सारखेसारखे धुवावे लागत नाही. कारण हे कपडे (Clothes) लवकर खराब होत नाही. परंतु एक वेळ अशी येते की अनेकजण एकच जीन्स घालून बोर होतात तेव्हा जीन्स फेकण्याचा विचार सुरू करतात. जर तुम्ही देखील असच विचार करत असाल तर असे करू नका. जुन्या जीन्सचा देखील चांगला उपयोग होऊ शकतो. जाणून घेऊया असेच काही खास टिप्स.
किचनमध्ये स्वच्छता करण्यासाठी वापर :
जीन्सचा कापड मजबूत आणि लवकर फाटणारा असतो. यामुळे आपण जुन्या जीन्सचा वापर किचनमध्ये स्वच्छता करण्यासाठी किंवा घरातील धुळ स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करू शकतो. यासाठी तुम्हाला जीन्सचा कापड व्यवस्थित कापून एक मोठा कापड तयार करावा लागेल. यानंतर या कापडाच्या चारही बाजूने शिलाई मशीनने व्यवस्थित सिलाई करून घ्यावी.
शॉर्ट्स देखील तयार करू शकतो :
जर तुमच्याकडे जून जीन्स आहेत तर त्याचा तुम्ही सदुपयोग करू शकतो. तसेच तुम्ही जर जीन्स घालून बोर झाले असाल आणि ते फेकून देण्याचा विचार करत असला तर असे करू नका. तुम्ही जुन्या जीन्सपासून मस्त आणि सुंदर शॉर्ट्स तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जूना जीन्स घ्यावा लागेल . त्याचा तळाचा आणि मस्त डिझाईन असलेला भाग कापून तुम्ही शॉर्ट तयार करू शकता. अशा पद्धतीने तुमची नवीन आणि मस्त शॉर्ट्स तयार झाली आहे.
स्कूल किंवा कॉलेज बॅग तयार करू शकता :
जुन्या जीन्सपासून तुम्ही सुंदर आणि आकर्षक स्कूल बॅग तयार करू शकता. तुमहि जर शाळेत किंवा कॉलेजमध्ये जात असला तर तुम्ही जुन्या जीन्सपासून बॅग तयार करू शकता. तसेच कॉलेजमध्ये फॅशन देखील करू शकता. जीन्सची बॅग तयार करणे अतिशय सोपे आहे. यापासून मजबूत अशी बॅग तयार होते. तसेच तुम्ही भाजी आणण्यासाठी आणि इतर समान आणण्यासाठी जीन्सच्या बॅगचा वापर करू शकता.
वैक्सिंगच्या स्ट्रिप तयार करण्यासाठी उपयुक्त :
जुन्या जीन्सचा वैक्सिंगच्या स्ट्रिपस् तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला पाहिजे तसे आणि वेगवेगळ्या आकारातील स्ट्रिप तयार करू शकता. तसेच याचा तुम्ही पुनः देखील वापर करून शकता. एकदा वापर झाला की त्या स्वच्छ धुण घ्यावे. पुन्हा वापरासाठी स्ट्रिप तयार असतील. या स्ट्रिप गरम पाण्याने धुवावे. जीन्सच्या स्ट्रिपने वैक्सिंग अतिशय चांगल्या पद्धतीने होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.