Health Tips: रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त आहेत फायदे
Health Tips: रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त आहेत फायदे Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांना दिवसा आंघोळ (showering) करण्यापेक्षा रात्री आंघोळ करायला आवडते. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा (weariness) आणि ताण (Stress) कमी होतो. रात्री आंघोळ केल्याने शरीराला (Body) अनेक फायदे (Advantages) होतात. चल तर मग जाणून घेवुया रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे.

* चांगली झोप येते

रात्री आंघोळ केल्याने शरीर आणि मेंदू शांत होतो. यामुळे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत मिळते. झोपण्यापूर्वी एक तासआधी कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे आपल्याला लवकर झोप येते. याचे कारण म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे तापमान कमी होते यामुळे चांगली झोप येण्यास मदत मिळते.

* त्वचेमध्ये चमक येते

तुम्हाला जर पिंपल्सची समस्या असेल तर झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ केल्यास चेहऱ्यावरील पीपल्स कमी होण्यास मदत मिळते. तसेच त्वचा कोरडी आणि निर्जीव पडत नाही. थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा चमकदार होते.

* पावसाळ्यातील संसर्गापासून बचाव होतो

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने दिवसभर शरीरावर बसलेले जिवाणू कमी होतात. पावसाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही झोपण्यापूर्वी नियमितपणे आंघोळ केली तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

* केसांचे आरोग्य उत्तम राहते

झोपण्यापूर्वी केस धुतल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते. केस लांब आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. तसेच रात्री केस धुतळल्याने केस चांगल्या पद्धतीने वाळवता येतात.

* घामापासून मुक्ती

सकाळी आंघोळ केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. परंतु रात्री आंघोळ केल्याने दिवसभरातील थकवा कमी होण्यास मदत मिळते. तसेच शरीराचा दुर्गंध कमी होण्यास मदत मिळते. यामुळे नियमितपणे झोपण्यापूर्वी आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायी असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

SCROLL FOR NEXT