Dengue Treatment: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

डेंग्यूवर (Dengue) वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.
Dengue Treatment: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Dengue Treatment: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपायDainik Gomantak
Published on
Updated on

डासांमुळे सर्वात वेगाने पसरणारा आजार म्हणजे डेंग्यू( Dengue). हा आजार मादी डासांच्या चाव्यामुळे होतो आणि ते डेंग्यूचा (Dengue) विषाणू पसरवतात. डेंग्यू तापला ब्रेन बोन फिवर देखील बोलल्या जाते कारण तापामुळे हाडांमध्ये (Bones) खूप वेदना होतात. ताप (Fever) , डोकेदुखी (Headache) , त्वचेवर पुरळ येणे आणि सांधेदुखी अशी डेंग्यूचे अनेक लक्षणे (Symptoms) आहेत. डेंग्यूवर वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे. उपचारासाठी आरोग्य तज्ञाशी संपर्क साधावा, पण काही घरगुती उपाय देखील या आजारवर गुणकारी आहेत.

Dengue Treatment: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Sugarcane Juice: आरोग्य आणि त्वचेसाठी उसाचा रस आहे गुणकारी

* व्हिटॅमिन सी (Vitamin C)

डेंग्यू (Dengue) आजारावर व्हिटॅमिन 'सी' युक्त पदार्थांचे सेवन करणे लाभदायी ठरते. यामुळे आपले शरीर निरोगी राहते. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. शिवाय कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत करते. यात लिंबू, पालक, केळी, किवी यासारख्या पदार्थांचे सेवन करावे.

* हळदीचा उपयोग (Use of turmeric)

हळदीमध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात. हळदीचा वापर साधारणपणे भाज्यामध्ये होतो. याशिवाय तुम्ही दूधामध्ये हळद टाकून घेवू शकता. यात अॅंटी बॅक्टेरिया गुणधर्म असतो. हळदीचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अनेक रोगांपासून बचाव करते.

* तुळस आणि मध (Basil and honey)

मध आणि तुळशीचा वापर केल्याने डेंग्यूचा (Dengue) ताप कमी होण्यास मदत मिळते. यासाठी तुळशीचे पान उकळून घ्यावे. नंतर त्यात मध टाकून प्यावे. तसेच तुम्ही चहाचा काढा तयार करतांना तुळशीचे पाने टाकू शकता. यात असणाऱ्या अॅंटी बॅक्टेरियामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत मिळते.

* पपईचे पाने (Papaya leaves)

पपईच्या पानांचे सेवन केल्याने डेंग्यू (Dengue) ताप कमी होण्यास मदत मिळते. यासाठी पपईच्या पानांचा रस दिवसातून दोनदा दोन ते तीन चमचे प्यायल्यास डेंग्यूचा ताप कमी होतो. पपईच्या पानांमध्ये प्रथिने, एंजाइम मुबलक प्रमाणात असल्याने आपल्या शरीराची पचनशक्ती चांगली राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com