Hair Fall reasons  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Unhealthy Food: 'या' पदार्थांच्या सवयींमुळे गळू शकतात केस, वेळीच व्हा सावध

bad food for hair: जर तुमचे सतत केस गळत असेल तर केसांच्या तुमच्या काही वाईट खाण्याच्या सवयीही यासाठी कारणीभूत असू शकतात.

Puja Bonkile

bad food habits that can cause hair fall read full story

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येला सर्वांनी कधी ना कधी सामना केला आहे. केसगळतीसाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. 

सामान्यतः असे दिसून येते की जेव्हा केस सतत गळतात, तेव्हा लोक त्यांच्या केसांसाठी वापरणारे हेअर प्रोडक्ट पुन्हा पुन्हा बदलत राहतात. पण याचाही त्यांना फायदा होत नाही. कारण तुमच्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता असते. यामुळे केस खुप कमकुवत होतात आणि केस गळू लागतात. 

सर्वात महत्वाचे म्हणजे आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. कारण याचा परिणाम आरोग्यासग केसांवर देखील होतो.

प्रोटिनचा अभाव

जर तुमचे सतत केस गळत असेल तर त्याचे एक कारण तुमचे प्रोटीनचे प्रमाण कमी असू शकते. केसांचा बिल्डिंग ब्लॉक केराटिन नावाचे प्रोटीन आहे. त्यामुळे जेव्हा आहारात प्रोटीनची कमतरता असते, तेव्हा केस गळण्याचा धोका जास्त असतो. आपल्या आहारात पातळ प्रथिने, कडधान्ये, पालक, बीन्स आणि टोफू इत्यादींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

प्रक्रिया केलेली साखर जास्त प्रमाणात वापरणे 

जर तुमचा आहार असा असेल की तुम्ही जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेली साखर खात असाल तर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. कारण जास्त साखर शरीरात जळजळ होऊ शकते. यामुळे केसांच्या कूपांचा त्रास होतो आणि केस गळू शकतात.

आहारात फॅटी ऍसिडची कमतरता

केसांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणेही आवश्यक आहे. जर आहारात या आवश्यक आरोग्यदायी फॅटी अॅसिडची कमतरता असेल तर तुमचे केस कमकुवत आणि कोरडे होऊ लागतात. त्यामुळे तुमचे केस तुटण्याचा आणि गळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

उच्च ग्लायसेमिक पदार्थांचे सेवन

जर तुम्ही जास्त ग्लायसेमिक पदार्थ खाल्ले तर त्याचा तुमच्या केसांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे घडते कारण उच्च ग्लायसेमिक पदार्थ सहजपणे साखरेमध्ये मोडतात. साखरेच्या अतिसेवनाने शरीरात इन्सुलिन आणि एंड्रोजन वाढेल, ज्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर नक्कीच होतो. यामुळे तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते   .

लोह आणि झिंकचा अभाव

जर तुम्ही तुमच्या आहारात लोह आणि झिंकच्या सेवनाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला जास्त केस गळण्याची समस्या देखील भेडसावू शकते. जस्त आणि लोह दोन्ही केराटिन तयार होण्यास मदत करतात. 

एवढेच नाही तर तुमच्या आहारात पुरेसे लोह नसल्यामुळे केसांच्या कूपांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, परिणामी केस गळतात आणि पातळ होतात. आपल्या आहारात सीफूड आणि लाल मांस इत्यादींचा समावेश करावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही बीन्सचे सेवन करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT