Bad Cholesterol Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bad Cholesterol Effects: हृदयासाठी घातक आहे खराब कॉलेस्टॉल, अशा घ्या स्वत:ची काळजी

खराब कोलेस्टॉलचे शरीरात प्रमाण अधिक असल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Puja Bonkile

Bad Cholesterol Effects: खराब कॉलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चरबी आहे जो शिरांमध्ये जमा होतो. हा मेणासारखा चिकट पदार्थ आहे. जो रक्त आणि प्रथिनांसह शरीराच्या प्रत्येक नसापर्यंत पोहोचतो. हे हृदयासाठी सर्वात धोकादायक आहे. 

याचा शिरांमधील रक्त परिसंचरणावर गंभीर परिणाम होतो. यासोबतच शिरांच्या आतील थरांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे, कधीकधी ब्लॉकेजची परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. 

ही अत्यंत जीवघेणी परिस्थिती आहे. कॉलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. खराब कॉलेस्टेरॉल ज्यामुळे शरीरात समस्या निर्माण होतात. त्याला LDL म्हणतात. दुसरे म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल. रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाहासाठी हे खूप महत्वाचे आहे. त्याला एचडीएल म्हणतात. 

उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदय आणि मज्जातंतूंचे नुकसान

तज्ज्ञांच्या मते, खराब कॉलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि कोरडेपणा देखील होतो. त्यामुळे नसा कमकुवत होतात. त्यांच्या फुटण्याचा धोका वाढतो. 

याशिवाय पोषक तत्वांची कमतरता असते. शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे व्यक्तीला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. उच्च कॉलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांना चिकटून राहते. 

त्यामुळे रक्तवाहिन्या आणि धमन्या कमकुवत होतात. त्यांची प्रकृती बिघडली तर हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. यामुळेच कॉलेस्टेरॉलला मूक रोग म्हटले जाते. हे जीवघेणे सिद्ध होते. 

आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या खाण्याच्या सवयींमुळे हा आजार झपाट्याने पसरत आहे. कॉलेस्टेरॉलसारख्या जीवघेण्या आजाराला दर पाच जणांपैकी दोन जण बळी पडतात. त्यांना याची माहितीही नाही तर हृदयविकाराचा झटका किंवा जीवितहानी झाल्यास, खराब कॉलेस्टेरॉल चाचणीत दिसून येते. हे टाळण्यासाठी, नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच चांगल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. पोषक आहाराचे सेवन करावे. नियमितपणे रोज व्यायाम आणि योगा करावा. 

कॉलेस्टॉलचा धोका कसा ओळखावा

उच्च कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत शरीरात क्वचितच कोणतीही लक्षणे दिसत नाही. परंतु काही लहान समस्या उद्भवतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पुढील लक्षणे दिसताच सावध व्हावे.

  • छातीत दुखणे

  • अशक्तपणा येणे

  • हात-पायांवर अचानक सूज येणे

वरील लक्षण उच्च कोलेस्टेरॉलची आहेत. अशावेळी या आजाराबाबत सावध राहण्यासाठी रक्त तपासणी नक्कीच करून घ्यावी. 

अशी घ्यावी काळजी

  • दर सहा महिन्यांनी ते वर्षभरात कॉलेस्ट्रॉल शोधण्यासाठी लिपिड प्रोफाइल चाचणी करावी. विशेषत: 25 वर्षांनी ही चाचणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • उच्च कॉलेस्ट्रॉल टाळण्यासाठी आपले वजन नियंत्रित ठेवावे. 

  • कॉलेस्टॉल नियंत्रणता ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावे. तसेच आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचाही समावेश करावा. 

  • प्रोसेस केलेले खाद्यपदार्थ, संतृप्त, लाल मांस आणि अल्कोहोलसारखे अस्वास्थ्यकर पदार्थ आहारातून काढून टाका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT