Health Care Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: 'हे' पेय काही मिनिटांमध्येच थांबवू शकतात रक्त प्रवाह

जर तुम्ही हाय कॉलेस्टेरॉल, हाय बीपीचे रुग्ण असाल किंवा तुमचे शरीर लठ्ठ असेल तर तुम्हाला काही पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Bad Cholesterol: आजकाल लोक कमी वयातच हृदयविकाराचे शिकार होत आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्येही लठ्ठपणा आणि हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या दिसून येत आहे. पण या समस्या लहान वयातच कसे काय उद्भवतात. काही शीतपेयांच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील कॉलेस्ट्रॉल वेगाने वाढते आणि नंतर हळूहळू हृदयविकार वाढतो. चला तर मग जाणून घेऊया कॉलेस्ट्रॉल वाढवणारे कोणते पेय आहेत.

आइस्क्रीम

आइस्क्रीम खायला सर्वांना आवडते. परंतु दुग्धजन्य पदार्थ तुमचे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवू शकते. विशेषत: नियमितपणे सेवन केल्यास ही समस्या वाढते. आजकाल अनेक प्रकारच्या फ्रूट शेकमध्ये आइस्क्रीम टाकले जाते आणि ते पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

क्रीम-बटर स्मूदी

केशर क्रीम दूध, रबडी, लस्सी आणि ताक चविष्ट बनवण्यासाठी दुकानदार अनेकदा मलाई आणि बटरचा अधिक वापर करतात. पण ते पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे प्यायल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

फॅटवाले पदार्थ

जास्त फॅट असलेल दूध खाल्ल्याने चवीला खूप चविष्ट लागते. पण ते प्यायल्याने शरीरातील चरबी आणि कॉलेस्ट्रॉल वाढू शकते. खरं तर फॅटयुक्त सामग्री रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिकटून राहते आणि तुम्हाला अडथळे निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्याऐवजी कमी चरबीयुक्त दूध वापरावे.

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफी अतिप्रमाणात प्यायल्याने हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. यामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कॉफीमध्ये कॉलेस्टेरॉल नसते. परंतु त्याचा कॉलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो. कॉफीमध्ये डायटरपीन संयुगे असतात. जे कॉलेस्ट्रॉल पचन करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन कमी करते आणि ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे चहाचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे वरील सर्व पेये पिणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT